पसंदीसाठी १०० पेक्षा अधिक ब्रँड ; २५० पेक्षा अधिक व्हरायटीज् ; जिल्ह्याच्या इतिहासातील पहिलाच पैठणी महोत्सव
लातूर : देशभरात नामांकित वस्त्रदालनांमध्ये समावेश असलेल्या द्वारकादास शामकुमार वस्त्रदालनाच्या “डीएस एक्सक्लूझीव्ह”च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त १८ मार्च ते २८ मार्च या कालावधीत “हर घर पैठणी, घर घर पैठणी” हा भव्य दिव्य असा पैठणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे आहे. यामध्ये १०० अधिक ब्रँड आणि २५० पेक्षा अधिक व्हारायटीज् असून लातूरकरांसाठी हा पैठणी महोत्सव पर्वणी ठरणार आहे. लातूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे पैठणी महोत्सव होत आहे.
द्वारकदास श्यामकुमार वस्त्रदालनाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा डीएस एक्सक्लूझीव्हचा प्रथम वर्धापन दिन साजरा होत आहे. जगभरातील नामांकित कपड्यांचे ब्रँड एकाच छताखाली उपलब्ध करून देत वर्षभरात डीएस एक्सक्लूझीव्ह हे लातूर आणि परिसरातील नागरिकांच्या पसंतीला उतरले आहे. दरम्यान, डीएस एक्सक्लूझीव्हचा प्रथम वर्धापनदिना साजरा होत असून या निमित्त लातूरकरांच्या सेवेत प्रथमच उद्यापासून भव्य दिव्य असा ” हर घर पैठणी घर घर पैठणी महोत्सव-२०२३” आयोजित करण्यात आला आहे.
हा महोत्सव शनिवार दि.१८ मार्च ते २८ मार्च या कालावधी होणार आहे.
यामध्ये प्रसिद्ध येवला पैठणी, कडियाल बैंगलोर पैठणी, पेशवाई पैठणी, ब्रॉकेट पैठणी, गडवाल पैठणी, मुनिया पैठणी, टिशू पैठणी, टर्नंग बॉर्डर पैठणी, महाराणी पैठणी खण पैठणी, सप्तरंगी पैठणी, कॉपर जरी पैठणी, बनारसी पैठणी, मुद्रा पैठणी, नववारी पैठणी, मोर पैठणी, चेक्स पैठणी, कोता कोंडा पैठणी अशा एकूण 51 प्रकारच्या पैठण्यांचे प्रकारांचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. याठिकाणी विविध प्रकारच्या पैठणी साड्यांची विक्री ही डायरेक्ट कारागिरी रेटमध्ये होणार आहे. ३९९ रुपये ते ७५,००० रुपयांपर्यंतच्या पैठणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये कारागिराकडून पैठणी तयार होतानाचा प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

याशिवाय रोज नवनवीन पैठणीचा फॅशन शो दररोज सायंकाळी ६:३० ते ७:३० यावेळेत होणार आहे. यामध्ये १०० पेक्षा अधिक ब्रँड ; २०० पेक्षा अधिक व्हरायटीज् उपलब्ध आहेत. लातूर शहरातील अंबाजोगाई रोड येथील द्वारकदास श्यामकुमार वस्त्रदालनाच्या “डीएस एक्सक्लूझीव्ह” आणि कापड लाईन येथील नाथ कॉम्प्लेक्स येथील द्वारकदास श्यामकुमार वस्त्रदालनात हा “हर घर पैठणी, घर घर पैठणी” हा भव्य दिव्य महोत्सव होणार आहे. तरी या भव्य अशा वस्त्र महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी असे आवाहन द्वारकदास श्यामकुमार वस्त्रदालनाचे संचालक तुकाराम पाटील यांनी केले आहे.