लातुरातील रवींद्रनाथ टागोर नगर येथे विकसित होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा बगीचा
मनपाच्या २ कोटी ३२ लाख रुपयांचा प्रस्तावास मंजुरी दिल्याबद्दल महापौरांनी मानले पालकमंत्री यांचे आभार
लातूर/प्रतिनिधी:
शहरातील रवींद्रनाथ टागोर नगर येथे बगीचा विकसित करण्यासाठी २ कोटी ३२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून विकसित केला जाणारा हा बगीच्या शहरातील सर्वात सुंदर, अद्ययावत व आंतराष्ट्रीय दर्जाचा बगीचा असेल, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहर महानगरपालिकेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अनुसूचित जाती वस्ती सुधार योजने मधून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. याबद्दल महापौरांनी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभारही व्यक्त केले. लातूर शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी महानगरपालिका काम करत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत लातूर महानगरपालिकेने केलेल्या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून विविध पुरस्कारांनी मनपाला सन्मानित करण्यात आले आहे. दैनंदिन स्वच्छता आणि जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे. स्वच्छते सोबतच शहर अधिक सुंदर आणि हरित करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणचे ग्रीन बेल्ट,मुख्य रस्त्यामधील दुभाजक आणि मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण केले जात आहे. शहरात बागीचांची असणारी कमतरता लक्षात घेता पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी याचाच एक भाग म्हणून शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या रवींद्रनाथ टागोर नगर येथील बगीच्या विकसित करण्यास मनपा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

लातूर शहर महानगपालिकेच्या प्रस्तावास मान्यता देत जिल्हा नियोजन समिती द्वारे त्यासाठी २ कोटी ३२ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या निधीमधून शहरातील सर्वात सुंदर बगीचा विकसित केला जाणार आहे.या बगीच्यामध्ये हिरवळीसह लहान मुलांसाठी खेळणी,वृद्धांना बसण्यासाठी अनोखी व्यवस्था आहे केली जाणार आहे.लवकरच हे काम सुरू होणार आहे, याचा आराखडा निवडण्यात पालकमंत्री अमित देशमुख यांनी विशेष लक्ष घातले होते असे सांगून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेमधून महापालिकेस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.
