25.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeकृषी*लातूर जिल्हा कृषि महोत्सवाचे आज होणार उद्घाटन*

*लातूर जिल्हा कृषि महोत्सवाचे आज होणार उद्घाटन*

  • स्टॉलच्या माध्यमातून कृषि व गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन
  • विविध विषयावर चर्चासत्र आणि परिसंवादाचे आयोजन

लातूर, दि. 7 (वृत्तसेवा)-: शेतकऱ्यांना आपापसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्यावतीने 8 ते 10 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत जिल्हास्तरीय कृषि महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) परिसर येथे होणाऱ्या या कृषि महोत्सवाचे उद्घाटन 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

राज्याचे पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन, कृषि मंत्री धनंजय मुंडे, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे आणि राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या हस्ते जिल्हा कृषि महोत्सवाचे उद्घाटन होईल. खासदार सुधाकर शृंगारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील, तर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची विशेष उपस्थिती राहील.

आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस, आमदार रमेश कराड, आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार धिरज विलासराव देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, पुणे गुण नियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील, पुणे आत्माचे संचालक दशरथ तांभाळे, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कृषि यांत्रिकीकरण, खते, किटकनाशके, सिंचनाचे साधने, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती कृषी क्षेत्रातील नाविण्यपूर्ण बाबी इत्यादीबाबत जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकरी यांना याबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, कृषि प्रक्रिया , पशुपालन, कृषि यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, सेंद्रीय शेती अशा विविध विषयावर चर्चासत्र आणि परिसंवाद, तसेच शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान या महोत्सवात केला जाणार आहे. यामध्ये स्टॉलच्या माध्यमातून कृषि व गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि उत्पादक ते ग्राहक दालनाच्या माध्यमातून माफक दरात थेट खरेदी व विक्री करता येणार आहे.

पहिल्या दिवशी सोयाबीन लागवडीबाबत मार्गदर्शन

लातूर जिल्हा कृषि महोत्सवामध्ये 8 फेब्रुवारी रोजी उद्घाटन कार्यक्रमानंतर पाटोदा येथील सच्चिदानंद नरहरी फड यांचे सोयबीन उत्पादकता वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञान, सुगाव येथील श्रीकृष्ण सदाशिव शिंदे यांचे सोयबीन पिकाचे विविध वाण व गुणधर्म आणि कृषि विद्यावेत्ता अरुण गुट्टे यांचे सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन होईल. सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्राची लोककला भारुड होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]