*लातूर जिल्हा : पर्जन्यमान / आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील अहवाल
लातूर:–दिनांक 23.09.2025*दिनांक 22/09/2025 रोजी लातूर जिल्ह्यामध्ये सरासरी 35.3 मिमी पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या तुलनेत (138.8 मिमी सरासरी) प्रत्यक्षात 224.5 मिमी पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर लक्ष देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहे.
दि. 1 जूनपासून आतापर्यंतचा पाऊस अपेक्षित पर्जन्यमानाच्या (663.8 मिमी) तुलनेत 783.0 मिमी म्हणजेच 118.0% इतका पाऊस झालेला आहे. लातूर जिल्ह्याची वार्षिक सरासरी (जून ते सप्टेंबर) 706.00 मिमी च्या तुलनेत आजतागायत 783.0 मिमी म्हणजेच 110.9% इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
*जिवीत हानी -*
मौ खानापूर ता. अहमदपूर येथील शेतकरी श्री माधव पांडुरंग खांडेकर शेळ्यांना पाला आणण्यासाठी गेले असता डिपि ला करंट लागून अंदाजे 11 वाजता मयत झाले
*पशुहानी -*
मौ. सोनवळा ता. जळकोट येथील श्री नागोराव बळदे यांचे बोकड पाण्यात वाहून मयत.मौ. पोहरेगाव ता. रेणापूर येथील श्री अंतराम पंडित कणसे यांचे एक कालवड विज पडून दगावले.मौजे किनीथोट ता.औसा येथील दिनांक 22/09/2025 रोजी दुपारी झालेल्या पावसात संजय काशिनाथ काळे यांचे बैल वीज पडून मरण पावलेमौजे धसवाडी ता. अहमदपूर येथील श्री. नामदेव शिवराम आयलवाड यांची म्हैस काल दि. 22.09.25 रोजी दुपारी आलेल्या पावसाच्या पुरात नाल्यामध्ये वाहून मयत झाली.

*घर पडझड-*
मौजे रोहिना ता. चाकूर येथे दि. 22/09/2025 रोजी झालेल्या पावसाने श्री शार्दुल ताहेर शेख यांचे घराची भिंत पडली आहे*सुरक्षित ठिकाणी स्थलांतर-*मौ जवळा बु ता. लातूर येथील मांजरा नदीला पूर आल्याने नदीजवळील सात ते आठ घरातील 25 लोकांना सुरक्षितपणे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात हलविण्यात आलेले आहे.
*शोध व बचाव कार्य-*

मौ. मंगरुळ, ता. औसा, येथील पुरात अडकलेल्या स्थानिक व्यक्तीस निलंगा शोध व बचाव पथकामार्फत बचाव करण्यात आला आहे.मौ. कवठा ता. औसा येथील एक व्यक्ती पुराच्या पाण्यात अडकली होती. स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत त्याची सुटका करण्यात आली आहे.लातूर येथील एक पथक पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने मोटार रेक्यू बोट व आवश्यक त्या साहित्यासह मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांचे दुरध्वनी संदेशान्वये तहसिलदार माढा ता. माढा जि.सोलापूर यांचेकडे पाठविण्यात आले आहे.

*खालील धरणे 100 टक्भक्यांपेक्षा भरलेली आहेतः-*-मांजरा प्रकल्प–
निम्न तेरणा प्रकल्प-रेणापूर, व्हटी, तिरू, देवर्जन, साकोळ, घरणी, तावरजा मध्यम प्रकल्प-एकूण लघू पाटबंधारे प्रकल्प 135-मांजरा, तेरणा, रेणा व तिरू नदीवरील बंधारे बॅरेजस मधून विसर्ग सूरू आहे.

*प्रभावित झालेल्या रस्त्याची / पुलांची माहिती*
खालील मार्गावर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहनांची वाहतूक तात्पूरती बंद करण्यात आली आहे.1. मौ. उस्तूरी ते टाकळी ता. निलंगा येथील ओढयाचे पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक बंद आहे.2. वांगजी-कवळी ता. औसा रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद3. लिंबाळा बंधारा वरील निलंगा-कासार शिरशी रोड पाण्याखाली असल्यामूळे वाहतूक बंद4. हारेगाव ता. औसा, पोमादेवी ता. औसा, चिंचोली ता. औसा येथील पूलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद5. औसा-भादा रोड हळदुर्ग येथील पूलावर पाणी साचलेले असल्याने रस्ता बंद6. राजेगाव लगतच किल्लारी-राजेगाव रोड वरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद7. मौ. गुंजरगा ता. निलंगा तालुक्यातील गुंजरगा येल्नूर रस्ता पूरामूळे बंद8. भेटा ते आंदोरा रस्ता पाण्याखाली आल्याने बंद9. मौ. मानेजवळगा ते शेळगी ता. निलंगा पाण्याखाली आल्याने बंद10. मौ. कार्ला ता. औसा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद11. कवठा- केज ते भादा ता. औसा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद12. काटेजवळगाव ते केदारपुर पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद13. पानचिंचोली ता. निलंगा येथे ढगफुटी पावसामुळे पानचिंचोली-दगडवाडी रस्ता बंद14. कासार शिरशी ते कोराळी ता. निलंगा जाणाऱ्या रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असून गावाचा संपर्क तुटला आहे15. चिंचोली भंगार ते निलंगा वाहतूक पूर्ण बंद झाली आहे16. चिचोंडी ते होसुर रस्ता बंद करण्यात आला आहे.17. शिराढोण ते कासार शिरशी रस्ता बंद करण्यात आला आहे.18. चिंचोली बंगाल व येळनूर नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे.19. गुंजरगा-तिवघाळा रस्ता तेरणा नदीच्या पुरामुळे बंद करण्यात आला आहे.20. सावरी वडाच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.21. लातूर – कळंब रोड पाणी वाहत असल्याने रस्ता बंद22. तुळजापूर ते औसा उजनी तेरणा नदीच्या पुरामूळे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.23. चिंचोली येथे पुलावर पाणी आल्यामुळे मुरुड गातेगाव बस चिंचोली येथून परत बोलवण्यात आली आहे24. अंबाजोगाई गरसुळी बस वांगदरी येथे पुलावर पाणी आल्यामुळे परत बोलवण्यात आले आहे25. औसा – मुरूड रस्ता बंद करण्यात आला आहे.26. औसा-मातोळा-माकणी रस्ता बंद करण्यात आला आहे.27. औसा -हसलगण -माकणी रस्ता बंद करण्यात आला आहे.28. औसा-गुबाळ -सास्तूर रस्ता बंद करण्यात आला आहे.29. औसा-अंदोरा-जायफळ रस्ता बंद करण्यात आला आहे.30. औसा-अलमला- लातूर रस्ता बंद करण्यात आला आहे.31. औसा- उटी रस्ता बंद करण्यात आला आहे.32. औसा- शिवली- धाराशिव रस्ता बंद करण्यात आला आहे.33. औसा- टाका- धाराशिव रस्ता बंद करण्यात आला आहे.34. औसा – गुळखेडा- मासूर्डी रस्ता बंद करण्यात आला आहे.35. निलंगा- उमरगा- कासारशिरशी रस्ता बंद करण्यात आला आहे.36. निलंगा- उस्तूरी रस्ता बंद करण्यात आला आहे.37. निलंगा- मानेजवळगा रस्ता बंद करण्यात आला आहे.38. निलंगा- मदनसूरी रस्ता बंद करण्यात आला आहे.39. निलंगा – किल्लारी (कोकळगाव) रस्ता बंद करण्यात आला आहे.40. निलंगा – बसवकल्याण (नेलवाड) रस्ता बंद करण्यात आला आहे.41. निलंगा – बसवकल्याण (बडूर, उस्तूरी) रस्ता बंद करण्यात आला आहे.42. उदगीर – लातूर (मार्गे देवर्जन) मार्गावरील वाहतूक शिरूर अनंतपाळ जवळील पांढरवाडी येथे पुलावर पाणी असल्याने बंद आहे.43. अतनूर येथील पूलावरून पाणी वाहत असल्याने उदगीर अतनूर मार्ग बंद आहे.

*आपत्कालीन परिस्थिती संपर्क-*पोलीस विभाग नियंत्रण कक्ष 100/112/02382-242296जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष (टोल फ्री 1077), 02382-220204लातूर शहर महानगरपालिका नियंत्रण कक्ष 02382-255585/9970964453आरोग्य विभाग- 108अग्निशमन केंद्र 101/02382-222101महावितरण नियंत्रण कक्ष 7875762021जिल्ह्यातील सर्वसंबंधित क्षेत्रिय अधिकारी फिल्डवर असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे.




