23.4 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडी*लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायत ते महानगरपालिका पर्यंत ' स्वच्छता ही सेवा ' या...

*लातूर जिल्ह्यात ग्रामपंचायत ते महानगरपालिका पर्यंत ‘ स्वच्छता ही सेवा ‘ या मोहिमेला लोकांचा उत्तम प्रतिसाद*

▪️ ■जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगेही झाल्या सहभागी

▪️◆ जिल्हा भर स्वच्छतामय वातावरण

▪️ ■922 गावे,शाळा अंगणवाडी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी

▪️ ◆अधिकारी कर्मचारी गावागावात सहभागी

लातूर, दि. 1 ( वृत्तसेवा ) स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा,अंतर्गत 1 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्यात ‘स्वच्छतेसाठी एक तारीख-एक तास’ ही मोहिम राबविण्यात आली . या अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे या लातूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महानगरपालिकेकडून आयोजित केलेल्या अभियानात सहभागी झाल्या. यावेळी नगरपालिका प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे, लातूर महानगरपालिका उपआयुक्त मयुरा शिंदे, उपआयुक्त विना पवार, शहरातील बचत गट, युवक संघटनाही सहभागी झाल्या होत्या.
लातूर ग्रीन टीमला भेटून त्यांचा उत्साह वाढविला. जिल्ह्यात या अभियानात हजारो लोक सहभागी झाले होते,यात अधिकारी,कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक,आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, बचत गट महिला,युवक मंडळ, गणेश मंडळ यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. गावातील परिसराची, शाळा अंगणवाडी, शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता केली.

स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या आदल्या दिवशी 1 ऑक्टोबरला स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास हा उपक्रम राबविण्यासा सर्व यंत्रणांनी तयारी केली होती.प्रसार माध्यमातून जाणीव जागृती निर्माण केली होती.रॅली पथनाट्य ,दंवडी, फेसबुक ,वाटसप, इंस्टाग्राम, वृत्तपत्र बातम्या यातून वातावरण निर्माण झाले होते.यामध्ये सार्वजनिक स्वच्छता व सफाई या बाबींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.


महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, ग्रामपंचायती, पर्यटन स्थळे, वारसास्थळे, , शाळा अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी ठिकाणी अभियानांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने श्रमदान करण्यासाठी पुढाकार घेतला .


सिंगल युज प्लास्टीकचा वापर व दुष्परिणाम याविषयी अभियान काळात जनजागृती केली शालेय स्तरावरही रॅली , पथनाट्य विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले . उपस्थित लोकांना स्वच्छता शपथ दिली. स्वच्छता चळवळ घराघरात पोहोचली पाहिजे. जन आंदोलन उभे राहिले पाहिजे.यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती.


जिल्हा परिषद परिसरात पण अधिकारी कर्मचारी यांनी हाती झाडू घेऊन सफाई केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा निरिक्षक महाजन सर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहन अभंगे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार कार्यकारी अभियंता बांधकाम अभय देशपांडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी चोले सर आरोग्य विभाग संतोष माने, प्रशासन अधिकारी बादणे,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक उध्दव फड,कक्ष अधिकारी किशोर कवळीकर, पाणी गुणवत्ता सल्लागार आनंद गायकवाड, लेखाधिकारी क्रातीकुमार खोबरे, अशोक वाकळे, शालेय स्वच्छता तज्ञ चांगदेव डोपे,प्रकाश म्हैत्रे, सचिन वडवले, विशाल बंडे मुल्यमापन सल्लागार संजय मोरे, जनार्दन समुद्रे आदीची उपस्थिती होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]