अवैध मद्यविक्री राज्य उत्पादन शुल्कसह
पोलीस विभागांची संयुक्त मोठी कारवाई
लातूर,दि.2 (जिमाका):- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक श्रीमती उषा वर्मा, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिलेल्या आदेशानुसार व विभागीय उप-आयुक्त पी. एच. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह़यातील अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांना मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार अधीक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, उदगीर यांचा स्टाफ तसेच पोलीस विभाग, देवणी यांनी तळेगांव, ता. देवणी, जि. लातूर या ठिकाणी दिनांक 2 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 1-30 वा. टाकलेल्या छाप्यामध्ये देशी व विदेशी मद्याचे 92 बॉक्स देशी दारु भिंगरी संत्रा – 180 मिली चे 90 बॉक्स व विदेशी मद्याचे दोन बॉक्स असे 2 लाख 66 हजार 740 रु. किंमतीचे मद्य तसेच बोलेरो पिक-अप जीप चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.-24/ एयु-2594 किंमत रूपये 7 लाख 50 हजार असा एकूण

10 लाख 16 हजार 740/- रुपयांचा विना वाहतूक पास असलेला अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.
या कारवाई मध्ये निरीक्षक आर. एम. चाटे, सहा. पोलीस निरीक्षक पी. जी. श्रृंगारे, दुय्यम निरीक्षक व्ही. पी. राठोड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अनंत कारभारी, सुरेश काळे, ज्योतीराम पवार, श्रीकांत एस. साळुंके, पोलीस नायक एसएस.बोयणे व वाहनचालक विक्रमपरळीकर यांनी सहभाग नोंदविला. पुढील तपास निरीक्षक आर. एम. चाटे हे करीत आहेत.
जिल्हयात अवैध मद्यविक्री विरोधात यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क, लातूर/ उदगीर विभाग व पोलीस विभागामार्फत रात्रीच्या गस्तीमध्ये ढाब्यावर बसून विनापरवाना जर कोणी मद्यप्राशन करतांना आढळल्यास त्यावर कारवाई होणार आहे. अवैध मद्याबाबत कोणी माहिती देणार असल्यास टोल फ्री 8422001133 या क्रमांकवर व या कार्यालयास माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवले जाईल असे, अधीक्षक गणेश बारगजे राज्य उत्पादन शुल्क लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
—




