लातूर लोकसभेचा संभाव्य युवा चेहरा असलेला
विश्वजित गायकवाड नेमका आहे कोण?
लातूर ;दि.२६ ( वृत्तसेवा ) -लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात संभाव्य युवा चेहरा म्हणून चर्चेत असलेला इंजि विश्वजित अनिलकुमार गायकवाड नेमका आहे कोण?या चर्चेला आता सुरुवात झाली असल्याने विद्यमान खासदाराच्या तिकिटावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..
आजपर्यंतची या मतदारसंघाची परंपरा पाहता या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अत्यंत विद्वान अश्या शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलेले आहे..अनेकवर्षं राजकारणात राहून शुचुर्भूत राजकारणची त्यांनी परंपरा जपली आहे.. ,रुपाताई पाटील,डॉ गोपाळराव पाटील,डॉ.जनार्धन वाघमारे,डॉ सुनील गायकवाड या सगळ्यांनी अभ्यासू परंपरा जपली आहे..

आता जो संभाव्य चेहरा म्हणून येत आहे ते विश्वजित गायकवाड एका उच्चशिक्षित घराण्याचे वारसदार आहेत,स्वतः स्थापत्य अभियंता असून काका माजी खासदार डॉ सुनील गायकवाड,वडील डॉ अनिलकुमार गायकवाड महाराष्ट्राच्या एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक,आजोबा स्व.बळीराम गायकवाड आदर्श शिक्षक आणि डॉ.बाबासाहेबांच्या संपर्कातील सहकारी,आई,भाऊ उद्योजक आणि व्यावसायिक आहेत..
स्थापत्य अभियांत्रिकीतील अनेक प्रयोग त्यांनी करून एक आदर्श उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे..

मराठी चित्रपटाचे निर्माते म्हणून त्यांनी काम केले आहे..येड्याची जत्रा आणि संदुक नावाच्या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली आहे..वत्सला बळीराम सेवाभावी संस्थेचे चेअरमन,डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल आणि इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट इन्स्टिट्युशन तडवाळा(धाराशिव)चे उपाध्यक्ष,AVAJ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रा.ली.संचालक,सरफेस ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंग कंपनीचे संचालक,ओरॅजिन इंटरटेन्मेंट प्रा.लि. संचालक,न्यूजमेकर्स ब्रॉडकास्टिंग अँड कम्युनिकेशन प्रा.लि.चे संचालक म्हणून ते काम पाहतात..सामाजिक विषयावर प्रकाश टाकल्याबद्दल वेड्याची जत्रा या चित्रपटाला 2012 चा उत्कृष्ट चित्रपटाचा 100 वा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे..नागबोधी इन्स्टिट्यूटचा बेस्ट मराठी भाषा पुरस्कार संदुक चित्रपटाला देऊन गौरवण्यात आले आहे..द इंडियन चेंबर ऑफ कॉमेर्सचा युवा उद्योजक पुरस्कार विश्वजित गायकवाड यांना मिळाला आहे..लोकप्रबोधन मीडिया हाऊसचा युवा लातूर आयकॉन पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या जैविक शक्तीचा वापर करून या भागाला सुजलाम सुफलाम बनवण्याचे स्वप्न असून शिक्षण आणि कृषी क्षेत्राला पूरक असलेल्या अनेक नवनवीन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्याचा मानस आहे..मेडिकल आणि अभियांत्रिकेचे हब असलेल्या या शहरात आयआयटी सारख्या संस्था आणणे,तूर डाळीसाठी आणि सोयाबीनसाठी प्रसिद्ध असलेल्या शहराच्या नावलौकीकत भर घालणारे केंद्रीय प्रकल्प आणणे,एमआयडीसीचे विस्तारीकरण आणि नवे उद्योग आणून बेरोजगारांच्या हाताला काम देणे,स्टार्ट अपच्या माध्यमातून नवनवीन उद्योगांना चालना देणे,आजही आरोग्यसेवेसाठी पुणे,मुंबई जाण्याऐवजी एखादे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणे,पाणी प्रश्नासाठी केंद्रातून पैसे उभारून उजणीचे पाणी लातूरला आणण्यासाठी निधी उभारणे आदि महत्वपूर्ण विषयावर काम करण्याची विश्वजित गायकवाड यांची इच्छा आहे..एक युवा चेहरा लातूरच्या लोकसभा राजकारणात येउ पाहत आहे.