23 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडीलातूर विकासासाठी २२ कोटी ५८ लाखांचा निधी

लातूर विकासासाठी २२ कोटी ५८ लाखांचा निधी


जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मंजुरी प्रदान
 महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार

    लातूर/प्रतिनिधी: 

शहरातील विविध विकास कामांसाठी २२ कोटी ५८ लक्ष रुपयांचा निधी पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेवरून मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने आज प्रशासकीय मंजूरी प्रदान केली आहे. विकास कामांसाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांचे आभार मानले आहेत.    लातूर शहरातील सर्वच प्रभागात रस्ते, गटारी, सामाजिक सभागृहांची उभारणी तसेच इतर विकासकामे यातून राबवण्यात येणार आहेत. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.१२ फेब्रुवारी २०२१रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकास कामे निवडण्यात येवून या कामांना मंजुरी देण्यात आली होती. या कामांच्या प्रस्तावास आज जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे.   मूलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत ७ कोटी रुपये तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती वस्ती सुधार योजनेअंतर्गत १५ कोटी १६  लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. दलितेतर वस्ती सुधार योजनेसाठी ४२ लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.   लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने या कामांसाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. कोरोना काळात विविध निर्बंध होते, त्यामुळे विकासकामे प्रलंबित राहिली होती. परंतु आता मोठ्या प्रमाणात शहरातील विकास कामे मार्गी लागत आहेत. या कामांमुळे शहराचा सर्वांगीण विकास साधला जाणार असून या माध्यमातून शहराचे रुपडे पालटण्याचा लातूर शहर महानगपालिकेचा  प्रयत्न आहे, अशी माहितीही महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]