22.8 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeसामाजिक*लिंगायत महासंघाच्या प्रदेश सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील*

*लिंगायत महासंघाच्या प्रदेश सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील*


जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके तर जिल्हा संघटकपदी काशीनाथ मोरखंडेंची निवड
लातूर ः लिंगायत महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांनी जाहीर केल्या. त्यात लिंगायत महासंघाच्या प्रदेश सरचिटणीसपदी चंद्रकांत कालापाटील यांची तर लिंगायत महासंघाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी कमलाकर डोके यांची तर जिल्हा संघटकपदी काशीनाथ मोरखंडे यांची निवड करण्यात आली.
लिंगायत महासंघाची कार्यकारिणी ही एका वर्षासाठी नेमलेली असते. एका वर्षानंतर त्या कार्यकारिणीचे नुतनीकरण केले जाते व त्यात नवीन पदाधिकारी नेमले जातात. त्यानुसार लातूर जिल्हा कार्यकारिणीची मुदत संपल्याने जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नुतन कार्यकारिणीच्या पदाधिकार्‍यांच्या निवडी प्रांताध्यक्ष सुदर्शनराव बिरादार यांनी जाहीर केल्या. त्या पुढीलप्रमाणे आहेत. कमलाकर डोके-जिल्हाध्यक्ष, काशीनाथ मोरखंडे-जिल्हा संघटक तर प्रदेश सरचिटणीसपदी निवड झालेले चंदक्रांत कालापाटील हे पुर्वी लातूर जिल्ह्याचे सरचिटणीस होते त्यांच्याकडेच जिल्हा सरचिटणीसपदही ठेवण्यात आले आहे. तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील भडीकर, करीबसवेश्‍वर पाटील, गणेश पटणे, प्रा.तानाजी सोनटक्के, प्रा.पंडीत देवशेट्टे, दिलीप सोलगे, माधव मल्लेशे, शिवानंद भुसारे यांची निवड करण्यात आली. तर कोषाध्यक्षपदी माणिकअप्पा मरळे, सहकोषाध्यक्षपदी शिवदास लोहारे तसेच सहसचिव म्हणून सुर्यकांत मळगे, तानाजी डोके हाडगेकर, आत्माराम हिंडे सताळकर यांची तर सदस्यपदी शरण पाटील कवठेकर, रमेशप्पा वेरूळे, संगय्या स्वामी, तुकाराम कावळे, योगीराज स्वामी, बसवराज विश्‍वनाथे, राजेश्‍वर हुडगे, गुरूनाथ हालिंगे यांची निवड करण्यात आली. तर मार्गदर्शक सल्लागारपदी सिद्रामप्पा पोपडे, विश्‍वनाथप्पा मिटकरी, गोरोबा काका शिवणे, जी.जी.ब्रम्हवाले, नागनाथ भुरके, विश्‍वनाथ सताळकर, विश्‍वनाथ सावळे स्वामी यांची निवड करण्यात आली.
या निवडीबरोबरच प्रदेश उपाध्यक्षपदी प्रा.डॉ.बसवराज करीअप्पा-परभणी यांची तर प्रदेश सदस्यपदी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अ‍ॅड.हल्लप्पा कोकणे यांची निवड लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शन बिरादार यांनी जाहीर केल्याचे सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]