25.5 C
Pune
Tuesday, June 10, 2025
Homeसहकार*लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली*

*लोकनेते विलासराव देशमुख यांना आदरांजली*

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या 

७८ व्या जयंतीदिनी, विलास कारखाना येथे आदरांजली अर्पण

लातूर प्रतिनिधी २६ मे :

   महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रिय मंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ७८ व्या जयंतीदिनानिमीत्त शुक्रवार दि. २६ मे रोजी विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

   विलास सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सकाळी अगोदर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या ७८ व्या जयंतीदिनानिमीत्त सर्व संचालकांच्या उपस्थितीत पुष्प अर्पन करून भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय रूग्णालयाच्या सहभागाने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

सदरील शिबीर विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी करण्यासाठी डॉ. श्वेता पातंगे, डॉ. पूर्णा जैन व कारखान्याचे डॉ.एस.एन.निकते तसेच सहाय्यक चौधरी, सुर्यवंशी, स्वामी, शिंदे यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र व्ही. काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक गोविंद बोराडे, अनंत बारबोले, भैरवनाथ सवासे, गुरुनाथ गवळी, बाळासाहेब बिडवे, नारायण पाटील, अमर मोरे, अनिल पाटील, रजित पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानोबा पडीले यांच्यासह कारखाना सभासद, शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी व कामगार तसेच ऊस तोडणी ठेकेदार आदी उपस्थित होते. 

—————————–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]