….
वडवळ नागनाथ ( प्रतिनिधी): संत सेना नाभिक संघटनेच्या वतीने बुधवारी (दिं.२४) येथील श्रीराम मंदिरात संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी तसेच संत सेना नाभिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
पुण्यतिथीनिमित्त मंदिरात सकाळी ह.भ.प. महादेव महाराज चौधरी आष्टेकर यांचे कीर्तन झाले. यावेळी त्यांनी संत सेना महाराजांनी समाजाला दिलेली शिकवण आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले. कीर्तनानंतर दुपारी बाराला सेना महाराजांच्या प्रतिमेवर गुलालाची उधळण करण्यात आली. यानंतर उपस्थित भाविकांना अनिल बाबुराव सुर्यवंशी यांच्या तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, विश्वासराव पाटील, माजी सदस्य हर्षवर्धन कसबे, सरपंच मुरलीधर सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, प्रभाकर स्वामी, विवेकानंद लवटे-पाटील तसेच नाभिक समाजासह विविध सांप्रदायिक महिला आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सुर्यवंशी, उपाध्यक्ष परमेश्वर सुर्यवंशी, माजी सरपंच भगवान लोखंडे, बाबुराव सुर्यवंशी, अनिल सुर्यवंशी, महादेव जगन्नाथ सुर्यवंशी, दत्ता लोखंडे, सचिन सुर्यवंशी, महादेव विठ्ठल सुर्यवंशी, दिलिप विठ्ठल सुर्यवंशी, गणेश सुर्यवंशी, सिद्धेश्वर सुर्यवंशी, रतन सूर्यवंशी, गजानन सूर्यवंशी, विजयकुमार लोखंडे, महारूद्र लोखंडे, आकाश सुर्यवंशी आदींनी पुढाकार घेतला.