वड सावित्री पोर्णिमेचे औचित्य साधून ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून वडाच्या रोपांचे वृक्षारोपण उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी २४ वडांच्या रोपांचे रोपण करुन त्यांना पाणी देण्यात आले. या रोपण केलेल्या वडाच्या झाडांचे महिलांनी पुजन करुन वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
हिंदू धर्मात पशू पक्ष्यांसह झाडांनाही विशेष महत्त्व दिले आहे. पिंपळ, तुळशी आणि केळीच्या झाडांना पवित्र मानले गेले आहे आणि या झाडांची पुजा केली जाते. या झाडांमध्ये देवांचा वास असतो असेही सांगितले जाते. या झाडांमध्ये वडाच्या झाडाचाही समावेश आहे. वटपौर्णिमेत वडाच्या झाडाला जास्त महत्त्व आहे. पण बेसुमार होत असलेली झाडांची कत्तल व कमी होत असलेल्या वडाच्या झाडांची संख्या पहाता वडाचे झाड लावायचे, त्याचे संगोपन करण्याची जवाबदारी घ्यायची व त्याची मनोभावे पुजा करायची या धोरणाने ग्रीन लातूर वृक्ष टीमतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुना औसा रोडवरील तेरणा वसाहत येथे हा वृक्षारोपण वडाच्या झाडाचे पुजन उपक्रम संपन्न झाला .
यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सौ. सुलेखा कारेपुरकर, सौ. कल्पना कुलकर्णी, एड. वैशाली यादव, रोहीणी पाटील, सौ. निता कानडे, डॉ. विमल डोळे, सौ. शितल गड्डीमे, सौ. दिपाली राजपूत, दिपाली खंडाळकर, सौ. रोहीणी खंडाळकर, सौ. महानंदा येलगट्टे यांनी व्रक्षारोपण उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
वड सावित्री पोर्णीमा निमित्ताने ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून २४० वडाच्या मध्यम आकाराच्या झाडांचे मोपत वितरण करुन झाडे जगविण्याचे आवाहन करण्यात आले.