30.7 C
Pune
Friday, April 25, 2025
Homeउद्योग*वस्त्रनगरीच्या औद्योगिक विकासात आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे मोलाचे योगदान*

*वस्त्रनगरीच्या औद्योगिक विकासात आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे मोलाचे योगदान*

चेअरमन तथा आमदार प्रकाश आवाडे यांचे वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रतिपादन

इचलकरंजी ; दि. २५ – (प्रतिनिधी ) — वस्त्रनगरीच्या औद्योगिक विकासात कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे मोलाचे योगदान आहे. अत्याधुनिकतेला प्राधान्य देत बँक भविष्यातही औद्योगिक क्रांतीसाठी कटीबध्द राहिल, अशी ग्वाही बँकेचे चेअरमन तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली.याप्रसंगी बँकेचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेची 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा इचलकरंजी येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात पार पडली. त्याप्रसंगी चेअरमन तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी
दोन वर्षे कोरोना महामारीचा काळ आणि त्यानंतर रशिया-युक्रेनमधील युध्दाचा परिणाम जगाच्या अर्थकारणावर झाला. त्यातून बँकिंग क्षेत्रसुध्दा सुटले नाही, असे सांगत आमदार आवाडे यांनी, वस्त्रनगरी आता अत्याधुनिक बनली असून साध्या लूमपासून ती आता शटललेस सिटी बनली आहे. त्याला चालना देण्यात जनता बँक अग्रणी असून विविध शासकीय योजना सुरु करुन त्याचा लाभही मिळवून दिला आहे. येणार्‍या सर्वच अडचणीतून मार्गक्रमण करत वाटचाल करताना येणारे वर्ष हे अतिशय चांगले असणार असल्याचे नमुद करत बँकेच्या सभासदांना लाभांश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या वाटचालीतून मार्गक्रमण करताना संस्थापक चेअरमन आवाडेदादांच्या नांवाला शोभेसे कार्य करुन बँकेचा वेगळा आदर्श निर्माण करुया, असेही ते म्हणाले.
प्रारंभी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगांवे यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूरी दर्शविली. आभार व्हा. चेअरमन चंद्रकांत चौगुले यांनी मानले. याप्रसंगी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, प्रकाश मोरे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, डी. जी. कोरे, भूपाल कागवाडे, अशोकराव सौंदत्तीकर, बाबासो पाटील, जयप्रकाश शाळगांवकर, विजय कामत, प्रकाश सातपुते, सत्यजित भोसले, अनिल कुडचे, संजय केंगार, नरसिंह पारीक यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]