*भारतीय शिक्षण प्रसारक संस्था म्हणजे संस्काराचे विद्यापीठ: मा.नामदार संजय बनसोडे*
(उदगीर)येथील दि.०१ ऑक्टोबर रोजी लाल बहादुर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मराठवाडा पातळीवरील आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे उद्घघाटन संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भा.शि.प्र संस्थेचे कार्यवाह नितीनजी शेटे,कार्यक्रमाचे उद्घघाटक महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा.नामदार संजय बनसोडे,विशेष उपस्थिती झी24तास चे लातूर जिल्हा प्रतिनिधी शशिकांत पाटील,प्रा. शिवाजीराव मुळे,चंदन पाटील नागराळकर,परीक्षक डॉ.गणेश बेळंबे,प्रा.रामदास कांबळे,प्रा.ऋषिकेश देशमुख,अँड.दीपक कुलकर्णी,शंकरराव लासूने,डॉ.संजय कुलकर्णी,संतोष कुलकर्णी,व्यंकटराव गुरमे,षण्मुखानंद मठपती,श्रीपाद सीमंतकर,मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी,उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,सी.बी.एस.ई स्कूलचे प्राचार्य श्रीपाद सिमंतकर,पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
शशिकांत पाटील या स्पर्धेस शुभेच्छा देताना म्हणाले की विद्यार्थी जीवनाचा पाया शाळेत घडत असतो.. आणि आपले संस्कार केंद्र हे कार्य योग्य पद्धतीने करत आहे.
उद्घघाटक मा.नामदार संजयजी बनसोडे उद्घघाटना प्रसंगी असे म्हणाले…. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था म्हणजे संस्काराचे विद्यापीठ होय, गुणवंताची खाण निर्माण करणारे केंद्र अशा स्पर्धेतून भावी नेतृत्व करणारी पिढी घडवली जाते.1978 पासून अविरत चालू असलेल्या या स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय समारोपात नितीनजी शेटे म्हणाले की मनुष्य घडणीसाठी प्रयत्न व भारतीय शिक्षणाचा प्रसार हेच मूळ उद्दिष्ट आपल्या संस्थेचे आहे.शिक्षणाची प्रणाली विकसित करणारी ध्येय प्रेरित संस्था आहे,वाद आणि विवाद स्पर्धेशिवाय माणसाला स्वतःला सिद्ध करता येत नाही..असे मत मांडले …
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ राऊत,प्रास्ताविक प्रदीप कुलकर्णी,स्वागत व परिचय अनिता येलमटे, वैयक्तिक पद्य स्मिता मेहकरकर,आभार निता मोरे यांनी मांडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले..











