आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते यशवंतवाडी येथील 55 लाख खर्चाच्या विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण
लातूर – रेणापूर तालुक्यातील मौजे यशवंतवाडी येथील 55 लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा भाजपाचे नेते आ रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते 6 सप्टेंबर बुधवार रोजी संपन्न झाला. मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मौजे यशवंतवाडी येथील वीस लाख रुपयाचे अंतर्गत सिमेंट रस्ता, दहा लाख रुपयाचा पेवर ब्लॉक रस्ता, दहा लाख रुपयाचे सभामंडप, आठ लाखाचे शाळेतील स्वच्छालय पाच लाख रुपये खर्चाचे जल जीवन मिशन अंतर्गत नवीन बोर व पाईपलाईन आणि दोन लाख रुपयांचे नाली बांधकाम अशा एकूण 55 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामाचा लोकार्पण आणि भूमिपूजन भाजपाचे नेते आ रमेशअप्पा कराड यांच्या शुभहस्ते झाले यावेळी विधानसभा अध्यक्ष अनिल भिसे तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे संगायो समितीचे अध्यक्ष वसंत करमोडे भाजपाचे महेंद्र गोडभरले रमाकांत फुलारी सिद्धेश्वर मामडगे सुरेश बुड्डे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.
यशवंत वाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना आ रमेशआप्पा कराड यांनी गावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही दिली मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास सरपंच ओम चव्हाण, उपसरपंच सौ मीरा सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर चव्हाण, सुनीता सूर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव सूर्यवंशी, ओमकार शिरसागर, धोंडीराम ठोंबरे, राजू काळे, सुलोचना सुगावकर, कोंडीबा जाधव, केशव मोरे, भिकाजी चव्हाण, गणपत चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, प्रभाकर सूर्यवंशी, दिलीप सूर्यवंशी,नारायण सूर्यवंशी, बाळासाहेब सूर्यवंशी, शंकर मोरे,अर्जुन सूर्यवंशी व समस्त गावकरी उपस्थित होते




