रेणापूर/प्रतिनिधी ः लातूर लोकसभा मतदार संघाचा प्रतिनिधी म्हणून काम करताना विकास हे एकमेव ध्येय माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक योजना मतदारसंघासाठी खेचून आणण्याचे काम मागील पाच वर्षात करत आलो आहे. या कामात कधीही जात व धर्म आडवा येवू दिला नाही. समाजातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून यापुढेही त्याच पध्दतीने लोकसेवक म्हणून कार्यरत राहीन अशी ग्वाही, लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, मनसे, रासप, महायुतीचे उमेदवार खा. सुधाकर शृंगारे यांनी दिली.

तालुक्यातील पानगाव येथे शुक्रवारी सकाळी महायुतीचा मेळावा संपन्न झाला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खा. शृंगारे बोलत होते. व्यासपीठावर डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, युवा नेते ऋषिकेश कराड, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, बाळासाहेब करमुडे, अमर चव्हाण, माजी सरपंच प्रदीप कुलकर्णी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विनोद आंबेकर, रिपाइंचे धम्मानंद घोडके, महेंद्र गोडभरले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खा. शृंगारे म्हणाले की, विकास हा एकमेव अजेंडा आमच्या डोळ्यासमोर आहे. खासदार म्हणून प्रत्येक गावाला विकासाचा निधी देण्याचे काम मी केले आहे. मागील 75 वर्षात शक्य न झालेले रेल्वेचे स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवले आहे. यापुढेही अनेक विकासकामे करावयाची आहेत. सामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबध्द आहे. त्यासाठी तुमचा मतदानरूपी आशीर्वाद हवा आहे, असेही खा. शृंगारे म्हणाले.
उपस्थित मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. शुक्रवारी सकाळी खा. शृंगारे यांनी ग्रामीण मतदारसंघात विविध गावांत भेटी दिल्या. कॉर्नर बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. काही ठिकाणी त्यांनी पदयात्राही काढल्या.

तालुक्यातील आरजखेडा येथे अगस्ती ऋषि सेवा आश्रमात जावून त्यांनी दर्शन घेतले. यावेळी सरपंच कुलदीप सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, भालचंद्र सूर्यवंशी, वाजीद पठाण, रामचंद्र सूर्यवंशी, आत्माराव सूर्यवंशी, खंडू जोगदंड, सचिन सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, राम सूर्यवंशी, धनंजय सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
दर्जी बोरगाव येथे खा. शृंगारे यांनी चिन्मयानंद स्वामी महाराज मठ संस्थान व हनुमान मंदिरात भेट देवून दर्शन घेतले. यावेळी युवा नेते ऋषिकेश कराड, भाजपा तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे, सरपंच रमेश कटके, निजाम शेख, अंकुल लोणकर, विजयकुमार चंबिले, मनसे तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश माने, प्रकाश रेड्डी, केशव सुरवसे, श्रीकृष्ण पवार, सदाशिव सुरवसे, गोकुळ सुरवसे, राधेशाम चंबिले यांची उपस्थिती होती.

खा. शृंगारे यांनी रेणापूर येथे रेणूका मातेचे दर्शन घेत व्यापार्यांशी संवाद साधला. यावेळी माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, वसंत करमुडे, शराध्यक्ष अच्युत कातळे, माजी सभापती दत्ता सरवदे, माजी नगरसेवक उज्वल कांबळे, श्रीकृष्ण मोटेगावकर, राजकुमार आलापुरे, हणमंत भालेराव, अंतराम चव्हाण उत्तम घोडके, राजू अत्तार, अजीम शेख, योगेश राठोड, रोहीत खुमसे आदींची उपस्थिती होती.
पानगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जावून खा. शृंगारे यांनी पवित्र अस्थी कलशास अभिवादन केले. ठिकठिकाणच्या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.