22.8 C
Pune
Monday, October 27, 2025
Homeमहत्त्वाच्या घडामोडीविचार माणुसकीचा, एक हात मदतीचा"

विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा”

औसा पॅटर्नचा नवा अध्याय — मनुष्यहानी, पशुधनहानी व घरहानीग्रस्तांना आ. अभिमन्यू पवार यांच्याकडून ९० लाखांची थेट मदत!”

दिवाळीपूर्वी दिलासा!

क्रीएटीव्ह आणि अभय भुतडा फाऊंडेशनमार्फत मदतीचा हात

बी बी ठोंबरे यांच्या हस्ते धनादेश वाटप—

औसा – ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यावर कोसळलेल्या अतिवृष्टीने औसा मतदारसंघात जनजीवन विस्कळीत झाले. पिकांचे मोठे नुकसान, घरात पाणी शिरून घरसामानाचे व घरांचे नुकसान, जनावरांचे मृत्यू आणि काही ठिकाणी थेट जीवितहानी या संकटांनी शेतकरी व ग्रामस्थांचे कंबरडे मोडले. या कठीण काळात औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी नेहमीप्रमाणे पुढाकार घेत “विचार माणुसकीचा, एक हात मदतीचा” या भावनेतून सुमारे ९० लाख रुपयांची थेट मदत जाहीर केली आहे.

ही मदत क्रीएटीव्ह फाऊंडेशन आणि अभय भुतडा फाऊंडेशनच्या माध्यमातून दिली जाणार असून, शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाई इतकीच रक्कम आमदार अभिमन्यू पवार यांच्या वतीने देखील दिली जाणार आहे. म्हणजेच, शासन जितकी मदत देईल, तितकीच मदत आ.अभिमन्यू‌ पवार सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून देतील, असा राजकीय नव्हे तर सामाजिक जाणिवेचा नवा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे जीव गमावलेल्यांच्या वारसांना शासनाकडून ४ लाख व आ.अभिमन्यू पवारांकडूनही ४ लाख — एकूण ८ लाख रुपये मिळणार आहेत. बैल दगावलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या ३२ हजार रुपयांइतकीच रक्कम आ. पवारांकडून; गाय/म्हैस दगावल्यास शासनाच्या ३७.५ हजार रुपयांइतकीच मदत पवारांकडून दिली जाणार आहे. तसेच, वासरू, शेळी, कोंबड्या, घर पडणे किंवा घरात पाणी घुसणे अशा सर्व प्रकारच्या नुकसानीसाठी शासन जितकी मदत देईल, तितकीच भरपाई आ. पवार देणार आहेत.एकूण ११२५ कुटुंबांना ही मदत मिळणार असून, दिवाळीपूर्वी विजय मंगल कार्यालय, औसा येथे एक विशेष कार्यक्रम आयोजित करून ‘कृषिरत्न बी. बी. ठोंबरे’ यांच्या हस्ते मदतीचे धनादेश व फूड पॅकेट्सचे वितरण होणार आहे

पूरग्रस्त शेतकरी

. ही मदत पंचनाम्यावर आधारित असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडणार आहे.विशेष म्हणजे, “शेत तिथे रस्ता”, “ग्रामसमृद्धी” अशा उपक्रमांमधून औसा पॅटर्न निर्माण करणाऱ्या आमदार पवारांनी आता ‘मदतीचाही औसा पॅटर्न’ उभा केला आहे. प्रशासनाची तत्परता, स्वतःची पाहणी, मुख्यमंत्र्यांना दौऱ्यावर आणणे, पाठपुरावा आणि आता ९० लाखांची मदत — हे सर्व म्हणजे केवळ प्रतिनिधीपद नव्हे तर जनतेप्रती असलेली बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित होते.”एक हात मदतीचा, विचार माणुसकीचा” या तत्त्वावर आधारलेली ही मदत केवळ आर्थिक नसून, औसाच्या जनतेसाठी विश्वासाचा हात आणि आशेचा नवा किरण ठरतो आहे.

यावेळी बोलताना आ.अभिमन्यू पवार यांनी “ज्यासाठी मदत मिळते, त्याच हेतूसाठी तिचा वापर व्हावा” अशी साद घालून सांगितले की, बैल दगावला असेल, तर मदतीने पुन्हा बैलच खरेदी करावा; गाय/म्हैस दगावली असेल तर तीच पुन्हा घ्यावी हाच माणुसकीचा खरा अर्थ आहे.तसेच, पीक आणि जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी शासकीय नुकसानभरपाई वाढवण्याचा पाठपुरावाही सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]