23 C
Pune
Friday, June 20, 2025
Homeसांस्कृतिक*विजयादशमीला आपल्या मदतीने एक नवीन पर्व सुरू झाले..*

*विजयादशमीला आपल्या मदतीने एक नवीन पर्व सुरू झाले..*

विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा !!

प्रबोधक परिवाराच्या अमित दातारच्या कल्पनेतून एक नवीन उपक्रम घ्यायचे ठरले.

एक हार समाजाच्यासाठी या मोहिमेत नागरी वस्तीतील 25 घरातील 75 बांधवांनी झेंडूचे 800 हार तयार केले. त्यातून त्यांना 8 तासात 16000 रुपयांची मिळकत झाली. त्यातून त्यांचे पुढील महिनाभराच्या अन्नधान्याची व्यवस्था झाली.

दोन गावातील शेतकऱ्यांची 6900 रुपयांची 160 किलो झेंडूची फुलं चांगल्या भावाने विकत घेतली.

यासाठीचे बीज भांडवल प्रबोधक परिवाराने जमा केले.

आपला नागरी वस्तीचा कार्यकर्ता शुभम काकडेच्या अथक प्रयत्नांनी हे शक्य झाले. त्याला MBA कारायवै होते पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो ते काही शिकू शकला नाही पण इच्छा शक्तीच्या जोरावर त्याने कुठल्याही तरबेज व्यवस्थापकाच्या तोडीचे काम केले.

प्रबोधिनीतील युवक विभागाच्या अनेकांनी मदत केली. अंबाजोगाईतील 100 कुटुंबांनी या सर्वांमध्ये सहभागी होत जवळपास 30000 रुपयांचे हार विकत घेतले. खास करून हारांची किंमत ठेवण्यात आलेली नव्हती. आपल्या स्वखुशीने दिलेली ही रक्कम होती.

भीक मागणारे हात ….हार बनवण्याच्या कौशल्यात तरबेज झाले आणि स्वतःच्या मेहनतीने कमावलेल्या मिळकतीतून ते आज दसरा साजरा करणार आहेत.

विजयादशमीला आपल्या मदतीने एक नवीन पर्व सुरू झाले

प्रसाद चिक्षे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]