अँड.शामराव कुलकर्णी यांजकडून
आज आषाढी एकादशीच्या परंमपवित्र दिनी औसा येथील श्री सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लिनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसा यांच्या नाथ मंदिरात स्वयंभू विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी औसा निलंगा तुळजापूर लातूर सह पंचक्रोशीतील हजारो वारकरी भाविक भक्तांची अलोट गर्दी आज उसळली होती विठ्ठल नामाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबांच्या नामघोशात नाथ मंदिर आसमंत दुमदुमून गेला होता.
श्री नाथ मंदिरात आषाढी एकादशी निमित्त पहाटे विठ्ठलाची महापूजा ….
नाथ मंदिरात आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे स्वयंभु श्री. विठ्ठला चीब्रम्हवृंदाच्या मंत्रघोषात महापूजा आरती संपन्न झाली. आज श्री. मच्छिंद्रनाथ महाराज श्री रवींद्रनाथ महाराज श्री बंडू पोतदर,श्रीअर्जुन ढगे, यांनी महापूजा केली. श्री पुरुषोत्तमाचार्य जोशी निटुरकर व श्री बालाजी देव यांच्या मंत्रघोषात अभिषेक व महापूजा संपन्न झाली. यावेळी पुजारी प्रशांत कंठे हरी शिंदे काका भोसले व भागवत गोंमदे यांनी महापुजेत सहभाग घेतला.आषाढी एकादशी निमित्त अनेक दिंड्या दाखल .

…………………………..आज आषाढी एकादशीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे अपचुंदा, कन्हेरी चलबुर्गा, याकतपुर,भोसले वाडी,किनीथोटे,येथील दींड्या ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करीत आपल्या गावापासून नाथ मंदिरात आल्या नाथ मंदिरातून ह भ प श्री श्रीरंग गहिनीनाथ महाराज यांच्या अधिपत्यात विठ्ठल नामाच्या व ज्ञानोबा तुकोबाच्या नामोशात औसा शहरातून नगर प्रदक्षिणा दिंडी निघाली व नंतर नाथ सभागृहात पोहोचून तिथे अभंग भजन विठ्ठलाचा नामघोष होऊन दिंडी सोहळा सांगता संपन्न झाली यावेळी ॲड.शाम कुलकर्णी, प्रा.श्री.नंदकुमार हालकुडे,श्री.प्रणव नागराळे , यांनी आपले विचार मांडले.भक्ती प्रेम सेवा कायम राहून सर्वांना सुख शांती समाधान लाभो …………………………………….

.दिंडी सोहळ्याची अभंग भजना नंतरझाली.यानंतर श्री.श्रीरंग महाराज औसेकर यांच्या हस्ते फराळ महाप्रसाद पुजन करण्यात आले.यावेळी बोलताना नाथ संस्थान मध्ये विठ्ठल भक्तीची परंपरा अडीचशे वर्षांची असून नाथ प्रतिष्ठान औसा या तरुण होत करू फक्त मंडळींनी गेल्या वीस वर्षापासून नाथ मंदिरात विठ्ठल दर्शनासाठी आषाढी एकादशी दिवशी येणाऱ्या हजारो वारकऱ्यांकरिता फराळ महाप्रसादाची व्यवस्था अत्यंत विपुल व श्रद्धेने केलेली आहे .शेकडो तरुण या अध्यात्मिक सेवेमध्ये परिश्रम घेऊन आषाढीचा हा सोहळा संपन्न करतात .

त्या प्रतिष्ठांच्या सर्वांना वारकऱ्यांच्या सेवेचे बळ मिळो व सर्व सदभक्तांना सुख शांती समाधान व आनंद जीवनात सदैव लाभो अशी प्रार्थना मी गुरु गादीच्या व विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी करतो असे भक्तिमय उद्गार ह भ प श्री श्रीरंग महाराज औसेकर यांनी काढले . व सर्वांनी शिस्तीत प्रशस्तपणे महाप्रसाद फराळ याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. आज आषाढी दर्शन व भव्य महाप्रसाद वितरण सोहळ्यात श्री वैजूआप्पा येळेकर, श्री गुंडानाथ सूर्यवंशी हरिभाऊ काळेकर ,योगेश सूर्यवंशी अर्जुन ढगे,सतीश नाईक, बंडू पोद्दार, जितूआप्पा इलेकर, श्री वसंतराव महामुनी, काका कारागीर, ईश्वर सावळकर, संजूआप्पा मिटकरी, दिलीप तोडकरी, व अनेक ज्ञात अज्ञात दानशूर व्यक्ती सद्भक्तनीजीवापाड परिश्रम घेतले.





