विठ्ठल मंदिर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून सौ. शितल मालू यांची वचनपुर्ती
लातूर/प्रतिनिधीः – माजी नगरसेविका सौ. शितल शिवकुमार मालू यांनी प्रभागातील कापड मिल परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचा जीर्णोद्धार करून मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याचे वचन नागरिकांना दिले होते. या वचनाची पुर्तता करत आज सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात विठ्ठल रुक्मीणी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.या सोहळ्यास प्रभागातील भाविकांसह नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगरसेविका सौ. शितल मालू यांनी केले आहे.

सौ. शितल मालू यांनी आपल्या नगरसेवकाच्या कार्यकाळात त्यांच्या प्रभागात असलेल्या डालडा फॉक्टरी परिसरात असलेल्या मारुती मंदिराचा तर सुतमिल परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्मीणी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला होता. त्याचबरोबर टागोर नगर परिसरात उभारण्यात येत असलेल्या हनुमान मंदिरासाठी मोठे अर्थसहाय्य केलेले होते. सदर बाब लक्षात घेऊनच कापड मिल परिसरातील नागरीकांनी सौ. शितल मालू यांची भेट घेत येथे असलेल्या विठ्ठल रुक्मीणी मंदिराचा जीर्णोद्धार करून या मंदिरात मुर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी अशी मागणी केलेली होती. या नागरीकांनी केलेल्या मागणीबाबत सकारात्मक विचार करून सौ. शितल मालू यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केलेला होता. यापुर्वीही सदर मंदिर बांधकाम करून देण्याचा शब्द अनेक लोकप्रतिनिधींनी दिलेला होता. मात्र त्यांनी हा शब्द पाळलेला नव्हता.

त्यामुळे सौ. शितल मालू आपला संकल्प पुर्ण करतील का याबाबत साशंकता निर्माण झालेली होती. त्यामुळेच सौ. शितल मालू यांनी कोणत्याही परिस्थितीत या मंदिराचा जीर्णोद्धार करून देत मुर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल असे वचन दिलेले होते.
या वचनाची पुर्तता करत सौ. शितल मालू यांच्या उपस्थितीत कापड मिल परिसरात असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला असून या विठ्ठल रुक्मीणी मंदिरात सोमवार दि. 19 फेब्रुवारी रोजी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त सकाळी 8 वा. कलश यात्रा व मिरवणूक काढण्यात येणार असून यानंतर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या विविध कार्यक्रमांना परिसरातील भाविकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी नगरसेविका सौ. शितल शिवकुमार मालू यांनी केले आहे.




