वैभव रेकुळगे,
वडवळ नागनाथ, दि.१७ – विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, शाळेतील उच्चशिक्षित शिक्षकामुळेच शाळेने न्यायाधीश, डॉक्टर घडवले आहेत. शाळेतील अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर काम करित आहेत. शिक्षण क्षेत्रात प्रदिर्घ सेवेेेनंतर आज मी सेवानिवृत्त झालो असलो, तरी संस्थेने मला कधीही ज्ञान दानसाठी संस्थेच्या उन्नतीसाठी बोलावल्यास मी निरंतर सेवेसाठी सदैव तयार आहे. समाजात ज्ञान दानाचे कार्य हे सर्वोच्च, असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ पाटील यांनी केले.
येथील विद्यानिकेतन विद्यालयाचे सहशिक्षक हे प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. यानिमित्त नुकताच विद्यालयात त्यांचा सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात यथोचित सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सिद्रामअप्पा आचवले उपस्थित होते तर व्यासपीठावर बस्वराज करकेली, सचिव प्रभाकर स्वामी, संचालक वैजनाथ नंदागवळे, काशिनाथ रेेेेड्डी, महादेव हालगरेेे, मुख्याध्यापक सतिश सांगवे, उपसरपंच बालाजी गंदगे, पत्रकार भरतसिंह ठाकुर, राजकुमार मोहनाळेे, शिवशंकर टाक, वैभव रेकुळगे, सदाशिव नंदागवळे, महादेव भेटे, श्रीधर बेरकिळे, डॉ.राजकुमार उळागड्डे शिवाजी कल्याणे, माणिकराव हालिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यानिकेतन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्रामप्पा आचवले यांच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक जगन्नाथ पाटील यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेसह गावांतील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करून आणि भेटवस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी बस्वराज करकेली प्रा.संजय स्वामी, धनाजी सुर्यवंशी, संजय नागाशंकर, राजकुमार मोहनाळे यांची भाषणे झाली.
सतीष सांगवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा.जयपाल पाटील यांनी सुत्रसंचालन तर रोहिणी बेद्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ए.डी.शेख, त्र्यंबक कांबळे, नरेश शिंधीकुमटे, बळीराम गुंडवाड, नागनाथ खेमे यांनी पुढाकार घेतला.