फिजिक्सवालाकडून (पीडब्ल्यू) पीडब्ल्यूएनसॅट २०२३ मध्ये अनावरणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी २०० कोटींच्या शिष्यवृत्तीची घोषणा
● २०२३ पीडब्ल्यूएनसॅट २०२३ मध्ये अद्वितीय विद्यार्थ्यांना १.५ कोटी रूपयांचे रोख पारितोषिकही दिले जाणार
नांदेड :पीडब्ल्यू (फिजिक्सवाला), या युनिकॉर्न एज-टेक कंपनीने भारतात व्यापक प्रमाणावर शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी पीडब्ल्यूएनसॅट २०२३ च्या (फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप कम अॅडमिशन टेस्ट) लाँचची घोषणा केली आहे. ही परीक्षा ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे आयोजित केली जाईल आणि ६ वी ते १२ वीतील विद्यार्थ्यांसाठी तसेच जेईई किंवा नीटची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही खुली असेल.
यावर्षी फिजिक्सवाला पीडब्ल्यूएनसॅट परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २०० कोटी रूपयांची शिष्यवृत्ती देखील देणार आहे. ही परीक्षा १ ऑक्टोबर, ८ ऑक्टोबर, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल आणि विद्यार्थ्यांना १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल. परीक्षेसाठीची नोंदणी पीडब्ल्यू वेबसाइट, अॅप किंवा जवळच्या पीडब्ल्यू सेंटरवर १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत करता येईल. परीक्षेचे निकाल २० ऑक्टोबर २०२३ रोजी जाहीर केले जातील.
विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अनुभवी शिक्षक सदस्यांद्वारे विद्यापीठ केंद्रांवरही शिक्षण घेता येईल. विद्यापीठ सेंटर्स संपूर्ण देशभरात स्थित असून जेईई/ नीटबाबत विद्यार्थ्यांना जे काही शिकणे आवश्यक आहे ते शिकण्यासाठी एक सर्वांगीण अभ्यासक्रम देतात. फिजिक्सवाला सातत्याने अभूतपूर्व निकाल देतो.
पीडब्ल्यूच्या विद्यापीठ ऑफलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित गुप्ता म्हणाले की, “पीडब्ल्यूएनसॅट परीक्षा ही विद्यार्थी समुदायाचे देणे देण्याचा आमचा प्रयत्न असून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा वैद्यक शिकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करतो. मागील वर्षी पीडब्ल्यूएनसॅट परीक्षेला प्रचंड यश मिळाले. या परीक्षेने १.१ लाखांहून जास्त विद्यार्थ्यांना मदत केली आणि १२० कोटी रूपयांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली. आमच्या मते प्रत्येक विद्यार्थ्याची आर्थिक पार्श्वभूमी काहीही असली तरी दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे.”
या वर्षी फिजिक्सवालाला पीडब्ल्यूएनसॅट परीक्षेत आणखी जास्त विद्यार्थी बसतील, अशी अपेक्षा आहे. या संस्थेला विश्वास आहे की, पीडब्ल्यूएनसॅट परीक्षा आणखी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा वैद्यक शिकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करू शकेल.




