#स्मृतिदिन #
राजा_नारायणलालजी
- लातूर नगरिसह संपूर्ण मराठवाडा प्रांताच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, सामाजिक वैभवात अमूल्य योगदान देणारे सामाजिक विभूती राजा नारायणलालजी लाहोटी यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
संचित धन, दौलत, सम्पत्तिवर नव्हे तर आपल्या कर्तुत्वाने, विचारसरनीने व दानी वृत्तीने त्यांना जन-मानसाने आपला ‘राजा’ बनविले.
प्रतिकूल परिस्थतीमध्ये शिक्षणाची गंगा घरोघरी पोचविणाऱ्या श्री मारवाड़ी राजस्थान शिक्षण संस्थेच्या माध्यामातुन हजारो सुशिक्षित, सुसंस्कृत तरुणांची पीढ़ी त्यांनी लातूर ला दिली तर काळाची गरज ओळखून लातुरला रेल्वे मार्गाशी जोडण्यासाठी तत्कालीन रेलवे मंत्री मो.जाफर शरीफ यांचा या विषयी यशस्वी पाठपुरावा करीत लातुरला रेल्वे आणली.
अशा रीतीने लातुरच्या प्रत्येक सामजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, आर्थिक चळवळीत अग्रस्थानि राहून लातूर शहराला आजचा चेहरा देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
आदरणीय राजा जींच्या कार्याचे मूर्तिमंत स्मारक असलेल्या श्री मारवाड़ी राजस्थान शिक्षण संस्था – राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल चा एक घटक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
प्रवीण शिवणगीकर