विलासबाग बाभळगाव येथे जनसमुदायाच्या उपस्थितीत
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री विलासराव देशमुख यांना ११ व्या स्मृतिदिनानिमीत्त आंदराजली अर्पन
लातूर प्रतिनिधी १४ ऑगस्ट २३:
देशाच्या राजकारणातील एक कर्तबगार, लोकप्रिय नेतृत्व आणि लातूर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांना त्यांचा ११ वा स्मृतिदिन निमित्ताने बाभळगाव येथील विलासबाग येथे देशमुख कुटूंबिय, विविध संस्थाचे पदाधिकारी तसेच मोठया जनसमुदायाच्या उपस्थितीत सार्वजनीक आदरांजली वाहण्यात आली.

सोमवार दि. १४, ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता विलासबाग, बाभळगाव येथे भावदर्पण हा कार्यक्रम सादर करण्यात आला. लातूरसह राज्यभरात यानिमीत्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदरणीय विलासराव देशमुख आणि देशमुख परिवारावर प्रेम करणारे स्नेही, मित्र, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी स्मृती स्थळी पुष्पांजली अर्पण करून आपल्या आवडत्या नेत्याला भावपूर्ण आदरांजली वाहिली.

लोकनेते विलासराव देशमुख यांना विलासबाग, बाभळगाव येथे प्रारंभी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, विलास साखर कारखाना चेअरमन वैशालीताई देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, अभिनेते रितेश विलासराव देशमुख, श्रीमती विजया देशमुख, अभिजीत देशमुख, सत्यजीत देशमुख, विनायकराव पाटील, डॉ.सारिका देशमुख यांनी आदरणीय विलासराव देशमुख यांना पुष्पांजली अर्पण केली.

देशमुख कुटूंबियाकडून आदरांजली अर्पन केल्यानंतर क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, उल्हासदादा पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे, मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, परभणी येथील अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नरे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, चेअरमन सर्जेराव मोरे, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, चेअरमन गणपतराव बाजूळगे, यांनी आदरांजली अर्पन केली.

या आदरांजली कार्यक्रमात माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, ललीतभाई शहा, आबासाहेब पाटील, माजी महापौर ॲड.दिपक सूळ, अशोक गोविंदपूरकर, ॲड.व्ही.बी.बेद्रे, बसवराज पाटील नागराळकर, व्हि.पी.पाटील, यशवंतराव पाटील, जगदीश बावणे, लक्ष्मणराव मोरे, ॲङ समद पटेल, जिल्हा शल्य चिकीत्सक लक्ष्मणराव देशमुख, जितेद्र देहाडे, राजेश्वर निटूरे, श्रीकांत सोनवणे, व्हा.चेअरमन प्रमोद जाधव, व्हा.चेअरमन विजय देशमुख, व्हा. चेअरमन रविद्र काळे, कल्याण पाटील, बी.व्हि.मोतीपवळे, राजाभाऊ जाधव, राजेसाहेब देशमुख, अमर खानापूरे, मुख्याध्यापक चंद्रकांत सांळूके, ज्ञानोबा आनंदगावकर, कमल जोधवानी, प्रा.शिवाजी जवळगेकर, महादेव मुळे, भाई नागराळे, अथरोददीन काझी, पप्पू देशमुख, धर्मराज हल्लाळे, व्यंकटेश पूरी, चंद्रशेखर दंडीमे, संतोष देशमुख, राजकुमार पाटील, अविनाश देशमुख, गोविंद बोराडे, उपसरपंच गोविंद देशमुख, ॲड. मोइज शेख, स्वाती जाधव, दगडेसाहेब पडीले, दै. एकमतचे संपादक मंगेश डोंग्रजकर, इम्रान सय्यद, तात्यासाहेब देशमुख, विजय निटूरे, अल्ताफ शेख, बालाजी कांबळे, लक्ष्मण कांबळे, बिभीषन सांगवीकर, अनिल चव्हाण, नारायण पाटील, सपना किसवे, संगीता मोळवणे, चांदपाशा इनामदार, कैलास पाटील, संभाजी रेडडी, अशोक (गट्टु) अग्रवाल, शाहूराज पवार, लालासाहेब देशमुख, इसरार सगरे, प्रदिप राठोड, संतोष तिडके, दिलीप माने, बालाजी सांळूके, एजाज शेख, संजय सगरे, सुभाष घोडके, मदन भिसे, पंडीत कावळे, प्रविण सुर्यवंशी, प्रविण कांबळे, अविनाश बट्टेवार, लक्ष्मण पाटील, महेश काळे, ॲड.अंगद गायकवाड, विजय निटूरे, मारूती पांडे, बसवंत बर्डे, दगडूअप्पा मिटकरी, संतोष तिडके, चंद्रकांत देवकते, शामराव सुर्यवंशी, ॲड.बाबासाहेब गायकवाड, तानाजी सुर्यवंशी, दत्ता सोमवंशी, गोविद केंद्रे, रमेश देशमुख, संभाजी सुळ, हकीम शेख, तबरेज तांबोळी, अभिजीत इगे, ॲङ देविदास बोरुळे पाटील, सुपर्ण जगताप, प्रा.गोविंद घार, मोहन सुरवसे, भगवान माकणे, सतीश पाटील, असिफ बागवान, ॲड. अंगद गायकवाड, सत्तारभाई शेख, प्राचार्य अजय पाटील, प्राचार्य मोहन बुके, डॉ. अरविंद भातांब्रे, डॉ. हणमंत किणीकर, सुभाष माने, संतोष सोमवंशी, प्रविण घोटाळे , अरुण समुद्रे प्रदिप नणंदकर, हरीराम कुलकर्णी शहाजी पवार, संजय पाटील, विनोद वीर, अभिजीत चव्हाण, अनिल पाटील, राजाभाऊ मोरे, अंगद वाघमारे, बालाप्रसाद बिदादा, हरीराम कुलकर्णी, सुलेखा कारेपूरकर, पृथ्वीराज शिरसाठ, जयेश माने दिलीप पाटील नागराळकर, सौ स्वयं प्रभा पाटील, सौ अनिता केंद्रे, व्यंकट बिरादार संचालक अनुप शेळके, ज्ञानेश्वर सागावे, विकास वाघमारे, विजय टाकेकर, शरद देशमुख, अजय बोराडे, राजेसाहेब सवई, हरी तुगावकर, राजेद्र मस्के, कैलास कांबळे, रमेश थोरमोटे, पांडूरंग वीर, ज्योती पवार, उषा कांबळे, उषा राठोड, नारायण लोखंडे, प्राचार्य गोविद घार, भारत आदमाने, सुर्यकांत सुडे, भैरवनाथ सवासे, संजय पाटील खंडापूरकर, दयानंद बिडवे, सरपंच प्रिया मस्के, सरोवर शेख, ज्ञानेश्वर भिसे, बादल शेख, रघूनाथ शिंदे, अजित काळदाते, सहदेव मस्के, नरेश पवार, नाना जाधव, यशपाल कांबळे आदीनी आदरांजली वाहीली.

आदरणीय विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमीत्त आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित असलेल्या विविध् क्षेत्रातील मान्यवर, संस्थाचे पदाधिकारी, काँग्रेस पक्ष व सलग्न संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या मनात विलासराव देशमुख यांच्या भावपूर्ण आठवणी यावेळी दाटून आल्या.

या प्रसंगी पुणे येथील सुप्रसिद्ध संगीतकार अभिनव गंधर्व पंडीत रघूनाथ खंडाळकर, पंडीत सुरंजन रघूनाथ खंडाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून भावदर्पण हा कार्यक्रम सादर सादर केला, तर सुत्रसंचालन बाळकृष्ण धायगूडे यांनी केले.
——————————




