24.5 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeठळक बातम्या*विलास को-ऑपरेटिव्ह बॅंकेची निवडणूक बिनविरोध*

*विलास को-ऑपरेटिव्ह बॅंकेची निवडणूक बिनविरोध*

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या 

नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्व ऊमेदवारांचे अर्ज वैध

लातूर प्रतिनिधी :  

अल्पावधीत नावारूपाला आलेल्या विलास को.ऑपरेटिव्ह बॅंक ली.च्या निवडणुकीसाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या माध्यमातून दाखल झालेले सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. जेवढया जागा तेवढेच उमेदवारी अर्ज छाननी नंतर शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून आता फक्त औपचारीक घोषणाच बाकी राहिली आहे. 

उदयोग,व्यापार वाढीस लागावा,शेतीपूरक व्यवसाय उभारले जावेत यासाठी तरूणमंडळींना वेळेत व आवश्यक तेवढे कर्ज उपलब्ध व्हावे हा उद्देश ठेऊन विलास को.ऑपरेटिव्ह बॅंक ली.ची स्थापना झालेली आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सुरू झालेली ही बॅक माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करीत अल्पावधीत नावारूपाला आली आहे. 

जवळपास २५० कोटींच्या ठेवी असलेल्या विलास को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या सध्या लातूर जिल्हयात अनेक शाखा असून लवकरच मराठवाडा आणि महाराष्ट्रात या बॅकेचा शाखा विस्तार होणार आहे. अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना सुलभ व जलद सेवा देणारी बॅक म्हणून विलास को.ऑपरेटिव्ह बॅकेचा लौकीक आहे. शेतकरी आणि मजूरही उदयोजक म्हणून ओळखले जावेत, गरजू विदयार्थ्यांना जलद गतीने कर्ज उपलब्ध करून देणे हा बॅकेचा मुख्य उददेश आहे. 

शहरी आणि ग्रामीण विकासात योगदान देत असलेल्या विलास को-ऑपरेटिव्ह  बॅंकेची सध्या निवडणूक प्रक्रीया सुरू असून १५ जागेसाठी होत असलेल्या या निवडणूकीसाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वातील पॅनलच्या माध्यमातून सर्वसाधारण गटातून ॲड. किरण शेषेराव जाधव, ॲड. समद रज्जाक पटेल, अनिल बाबाराव शिंदे, सुर्यकांत ज्ञानेश्वर कातळे, व्यकंटेश विश्वाभरराव पुरी, विजय गोविंदराव देशमुख, अरूण लक्ष्मणराव कामदार, अजय ललीतकूमार शहा, डॉ. कल्याण बलभीम बरमदे, आणि उस्ताद सलीम ताज्जमूलहूसेन तर महिला गटातून प्रा.स्मिता कैलास खानापूरे, डॉ.प्रा.जयदेवी पांडूरंग कोळगे, विमुक्त जाती / भटक्या जमाती राखीव गटातून चंद्रकांत लिंबराज धायगूडे, इतर मागास प्रवर्गातून सुनिल नामदेवराव पडीले तर अनुसुचीत जाती जमाती राखीव गटातून पंडीत कोडींबा कावळे यांनी ऊमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. छानणी नंतर हे सर्व अर्ज वैध ठरले आहेत. जेवेढया जागा तेवढेच अर्ज वैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. तांत्रीकदृष्या फक्त औपचारीक घोषणा बाकी आहे. 

या एकुण उमेदवारामध्ये सर्वश्री ॲड. किरण जाधव, अनिल शिंदे, सुर्यकांत कातळे, व्यकंटेश पुरी, अरूण कामदार, डॉ. प्रा. जयदेवी कोळगे, सुनिल पडीले, पंडीत कावळे यांना संचालकपदी पुनश्च संधी मिळाली आहे तर ॲड. समद पटेल, विजय देशमुख, अजय शहा, डॉ. कल्याण बरमदे, उस्ताद सलीम तज्जमूलहूसेन, प्रा.स्मिता खानापूरे, चंद्रकांत धायगूडे यांना नव्याने संधी मिळाली आहे. या नुतन संचालक मंडळाचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज देशमुख तसेच सहकार क्षेत्रात कार्यरत मान्यवर मंडळीनी अभिनंदन केले आहे. विलास को-ऑपरेटिव्ह बॅंक स्थापनेचा उददेश सफल करण्यासाठी नुतन संचालक मंडळ प्रयत्नशिल राहील असा विश्वास व्यक्त करून त्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हा सहकार उपनिबंधक एस.आर.नाईकवाडी काम पाहत आहेत.

—-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]