विलास सहकारी साखर कारखान्यास
वसंतदादा शुगर इंन्स्टिटयुटचा मानाचा राज्यपातळीवरील (उत्तर पूर्व विभागात)
तांत्रीक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार जाहीर
लातूर प्रतिनिधी रवीवार 7 जानेवारी 2024 : विलास सहकारी साखर कारखान्याने कारखाना उभारणी पासूनच तांत्रीकदृष्टीने कारखाना अदययावत राहील यासाठी प्रयत्न केले आहेत.
मिल मधील उसाचा तंतुमय निर्देशांक – 84.23 %.
रिडयूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन (RME) – 96.15.
साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा वापर % उस – 42%.
साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वीजेचा वापर – 31 % किलोवॅट प्रति टन उस.
गाळप क्षमतेच्या वापरा मध्ये वाढ – 12.17%
वरील गुणवतेमुळे उत्तर पूर्व विभाग – तांत्रिक कार्यक्षमेचा प्रथम क्रमांक वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांच्याकडुन जाहीर करण्यात आला आहे. साखर उदयोगात नवतंत्रज्ञानाचा वापर करून कारखाना गाळप कार्यक्षमता वाढ, उत्पादन क्षमता वाढ, साखर आणि उपपदार्थाची गुणवत्ता सुधारणा आणि यामुळे सभासद व ऊसउत्पादकांना अधिक ऊसदर देणे शक्य झाले आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे या संस्थेचा मानाचा राज्यपातळीवरील उत्तरपूर्व विभागातील तांत्रीक कार्यक्षमता प्रथम पुरस्कार विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळी ता.जि.लातूर ला गळीत हंगाम 2022-23 साठी जाहीर झाला आहे. मागील वर्षी कारखान्यास ‘उत्कृष्ठ ऊस संवर्धन’ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. विलास कारखान्यास सलग दोन वर्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांनी बक्षिस दिलेले आहे. त्यामुळे कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकी, खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार, ऊसतोडणी व ऊस वाहतुक ठेकेदार व हितचिंतक यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

विलास सहकारी साखर कारखान्यास हा पुरस्कार गुरूवार दि. 11 जानेवारी 2024 रोजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. पुणे येथे होणाऱ्या भव्य सोहळयात राज्यातील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार कारखान्याच्या वतीने राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख, व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक सजीव देसाई आणि सर्व संचालक स्विकारणार आहेत.
लातूरच्या सर्वांगीण विकासात मांजरा परिवाराचे उल्लेखनीय योगदान आहे. या परीवारातील सहकार आणि साखर उद्योग एक महत्त्वाचा उद्योग आहे. या उद्योगातून शेतक-यांना शाश्वत उत्पन्नाचा कायमस्वरूपी चांगला मार्ग उपलब्ध झाला आहे. या साखर कारखान्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची प्रेरणा, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचे मार्गदर्शन व संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख साहेब, लातूर ग्रामिणचे आमदार धिरज विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांचे नेतृत्वाखाली विलास सहकारी साखर कारखाना यशस्वी वाटचाल करीत आहे.
कारखान्यास या अगोदर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट सहकारी संस्था, सर्वोत्कृष्ट साखर कारखाना, सहकार भुषण, उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता, उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन, उत्कृष्ट ऊस विकास, सहकारनिष्ठ पारितोषिक, सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक, सर्वोत्कृष्ट चिफ अकौटंट असे एकूण 33 पारितोषिके मिळाली आहेत. या पारितोषीकामुळे कारखान्यास 25 वर्षात 34 पारितोषिके प्राप्त झाली आहेत. हा एक नवा विक्रम विलास कारखान्याने यशस्वी वाटचाल करून प्रस्तापीत केला आहे.
हा पुरस्कार विलास कारखान्यास जाहीर झाला आहे , याबददल मांजरा परिवाराचे मार्गदर्शक मा.माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकी, खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कामगार, ऊसतोडणी व ऊस वाहतुक ठेकेदार यांचे अभिनंदन केले आहे.
खोडवा हंगामातील सर्वाधिक ऊस उत्पादनासाठी
भैरवनाथ रधुनाथ सवासे यांची प्रथम पारितोषिकासाठी निवड
विलास कारखान्याचे लातूर तालुक्यातील कासारजवळा गावातील सभासद भैरवनाथ रघुनाथ सवासे यांना खोडवा हंगामासाठी को. ८६०३२ वाणाचे हेक्टरी २१५ मे. टन ऊसाचे उत्पादन घेतल्याबददल वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट ने खोडवा हंगामातील सर्वाधिक हेक्टरी ऊस उत्पादनाच्या प्रथम पारीतोषिकासाठी निवड केली आहे.
विलास कारखान्याच्या वतीने सभासद भैरवनाथ रघुनाथ सवासे यांना आधुनीक खोडवा व्यवस्थापन कसे करावे यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या निवडी बददल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले.