अतिरीक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लावतांना
विलास सहकारी साखर कारखाना
कडून दुप्पट कार्यक्षमतेचा वापर
७ लाख ६३ हजार मे. टन ऊसाचे गाळप
ऊसाला विक्रमी प्रति टन रु. २७७५ भाव
अंतीम हप्ता रू ३७५/- शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा
- ऊसबीलापोटी परीसरातील शेतकऱ्यांना २१२ कोटी रूपये अदा
- अनेक ऊंच्चाक प्रस्तापीत करीत यशस्वी गळीत हंगाम
- उत्पादीत साखरेची परदेशात निर्यात
- पर्यापरणपूरक झेडएलडी प्रकल्प कार्यान्वित
लातूर प्रतिनिधी १५ जूलै २०२२ :
लातूर जिल्हा आणि मरावाडयात अतिरीक्त ऊसाचा प्रश्प निर्माण झालेला असतांना लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना युनीट – १ ने दुपटीपेक्षा अधिक कार्यक्षमतेचा वापर करीत तब्बल ७ लाख ६३ हजार मे.टन ऊसाचे गाळप करण्यात केले. कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप झालेनंतरच बंद करण्यात आलेल्या या कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाला विक्रमी म्हणजे २७७५ रुपये भाव दिला असून यातील अंतीम हप्ता ३७५ रूपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.

अनेक ऊंच्चाक प्रस्तापीत करीत यशस्वी गळीत हंगाम
लातूर जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रियमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातून मांजरा परीवाराची उभारणी झालेली आहे. या मांजरा परीवारातील कारखान्याची वाटचाल माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नियोजनाने, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. या साखर कारखान्यामार्फत ग्रामिण भागाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. शेतकऱ्याशी बांधीलकी ठेऊन कारखान्याची वाटचाल चालू असल्यामुळे साखर कारखानदारीतील अनेक ऊस गाळप आणि ऊसदराचे उंच्चाक प्रस्तापीत झाले आहेत. हाच आदर्श डोळयासमोर ठेऊन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विलास कारखान्याची उभारणी झाली. चाचणी हंगामापासून विलास कारखान्याचे सर्व हंगाम यशस्वी झाले आहेत. आदरणीय साहेबांच्या प्रेरणेतून या कारखान्याची यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे. कारखान्याने सन २०२१-२२ हंगामामध्ये विक्रमी ७ लाख ६३ हजार ऊसाचे गाळप करून ८ लाख ५३ हजार साखरेचे उत्पादन केले आहे. हंगामात सहवीजनिर्मीती प्रकल्पात ५ कोटी ७९ लाख वीजनिर्मीती करून ३ कोटी १४ लाख विज निर्यात केली आहे.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या विलास सहकारी साखर कारखाना युनिट – १ कारखान्याकडून चालू गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये गळीत झालेल्या ऊसाच्या एफआरपीप्रमाणे अंतिम ऊसदर रु.२७७५/- असून कारखान्याने ऊसदरापोटी दोन हप्त्यात रु. २४०० /- अदा केले असून तिसरा हप्ता रू.३७५/- प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. त्यामूळे या कारखान्याकडून नुकत्याच पार पडलेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ऊसदरापोटी २१२ कोटी रूपये अदा करण्यात आले आहेत.

तांत्रीक कार्यक्षमतेचा पूरेपूर वापर
कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे वाढते क्षेत्र पाहता हंगामाची पुर्वतयारी चांगली करण्यात आली होती. पुर्वहंगामी कामे चांगली झाल्याने गळीत हंगाम काळात तांत्रीक कारणाने कारखाना बंद राहीला नाही. हंगामात ऊसाचे गाळप जास्तीत जास्त व्हावे याकरीता तांत्रीक कार्यक्षमतेचा जवळपास दुपटीने वापर करण्यात आला. शेतकी विभागाकडील सर्व यंत्रणेचा चांगला वापर करण्यात आला. यामुळे कार्यक्षेत्रासह लातूर जिल्हयातील ऊसाचे गाळप करून कारखाना गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्षेत्रातील अतिरीक्त ऊसाचे गाळप करीत असतांना साखर ऊतारा चांगला राखला.
कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप
मागच्या वर्षात समाधानकारक पाऊस झाल्याने लातूर व परीसरात ऊस लागवड वाढली होती. त्याच बरोबर एकरी ऊसाची उत्पादकता वाढली. परिणामी गळीत हंगाम सुरू होतांना मोठया प्रमाणात ऊसाचे क्षेत्र उपलब्ध होते. या कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप करणे आवाहानात्मक होते. असे असले तरी सभासद व ऊसउत्पादकांचे हित डोळया समोर ठेऊन साखर ऊतारा व इतर नुकसानीची कोणतीही पर्वा न करता शेतकऱ्याच्या ऊसाचे गाळप पूर्ण होई पर्यंत विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा परिवारातील सर्व कारखान्याने चालू ठेवण्याचे निर्देश माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी दिले होते. यामुळे विलास कारखान्यांने शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचे संपूर्ण गाळप झाल्यानंतरच गाळप हंगाम बंद केला.
उत्पादीत साखरेची परदेशात निर्यात
राज्यातील ऊसाचे वाढते क्षेत्र आणि साखरेच्या ऊत्पादनामुळे भारतीय बाजारपेठेत साखरेची मंदी निर्माण झाली होती. या सर्व परिस्थितीचा विचार करून विलास कारखान्याने ६ लाख २३ क्विंटल साखर परदेशात निर्यात केली आहे.
पर्यापरणपूरक झेडएलडी प्रकल्प कार्यान्वित
विलास कारखान्याने नेहमीच पर्यावरणपुरक काम केले आहे. साखर उदयोग चालवित असतांना कारखानातील गाळप प्रक्रीया प्रदूषणमुक्त ठेवली आहे. पुढील हंगामापासून प्रकीयेतील पाणी शुध्द करून पून्हा इंधन म्हणून वापरता येईल यासाठी पर्यावरणपूरक झेडएलडी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.
विलास सहकारी साखर कारखाना ली युनीट – १ चा
अंतिम दर रु. २७७५ अंतीम हप्ता रू ३७५/-
गळीत हंगाम २०२१-२०२२ मध्ये विलास साखर युनिट – १ कडून ७ लाख ६३ हजार मे. टन ऊसाचे गाळप करुन ८ लाख ५३ हजार क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसास कारखान्याकडून दोन हप्यात रु.२४००/- प्रमाणे रु. १८३ कोटी २२ लाख अदा करण्यात आले असून तिसरा हप्ता रु. ३७५/- प्रमाणे २८ कोटी ६३ अदा करण्यात येत असल्याची माहीती विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकादवारे दिली आहे.
शेतकऱ्यांना ऊसाच्या माध्यमातून अधिकात अधिक लाभ मिळवून देण्यासाठी माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब, माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख साहेब, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख साहेब, चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी घेतलेल्या भुमिके बददलही व्हा. चेअरमन रवींद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई सर्व संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
——-




