25 C
Pune
Saturday, June 21, 2025
Homeकृषीविविध उपक्रमाने अमित देशमुख यांचा वाढदिवस साजरा

विविध उपक्रमाने अमित देशमुख यांचा वाढदिवस साजरा

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांचा वाढदिवस 

विलास कारखान्याच्या वतीने विविध उपक्रमांचे 

आयोजन करुन केला साजरा

लातूर प्रतिनिधी : २१ मार्च २०२२:

  राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री  ना. अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळीच्या वतीने सर्व संचालकांच्या उपस्थितीत सोमवार दि. २१ मार्च २०२२ रोजी कारखाना स्थळी वृक्षारोपन, सर्वरोग निदान शिबीर, निळकंठेश्वर विदयालय, निवळी व कारखाना वसाहत येथील शाळेत शैक्षणिक साहित्यांचे वाटप, आणि मातोश्री वृध्दाश्रम लातूर येथे जिवनावश्यक वस्तुचे वाटप करून साजरा करण्यात आला.

   नेतृत्व किती उपक्रमशील आहे, यावर त्या परीसरातील घडामोडी अवलंबून असतात. लातूर जिल्हयात अभिनव उपक्रम राबविण्याचे काम ना. अमित विलासराव देशमुख यांनी गेल्या २५ वर्षामध्ये केले आहे. हे सर्व उपक्रम केवळ उत्सवी नाही तर प्रासंगिक आहेत. या उपक्रमामध्ये मोठया प्रमाणात लोकसहभाग वाढवून त्यांनी विकासाची चळवळच गतिमान केली आहे, त्याचा वाढदिवस विविध उपक्रमाचे आयोजन करून विलास कारखाना स्थळी साजरा करण्यात आला. 

  पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सोमवार दि. २१ मार्च २०२२ रोजी कारखाना स्थळी सकाळी सर्व संचालकांच्या उपस्थितीत पर्यावरण संवर्धन व सुशोभिकरणासाठी महत्वाच्या वृक्षाचे वृक्षारोपन करण्यात आले, यांनतर कारखाना स्थळी सर्वरोग निदान शिबीरामध्ये आरोग्य तपासणी आणि उपचार करण्यात आले. निवळी येथील निळकंठेश्वर विदयालय, व कारखाना वसाहत येथील शाळेत गरजवंत विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले, तसेच लातूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे जिवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले.

 यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, युवराज जाधव, अनंत बारबोले, बाळासाहेब बिडवे, अनिल पाटील, गोविंद डूरे, सूर्यकांत सुडे, रामदास राऊत, सुभाष माने, भारत आदमाने, संजय पाटील खंडापूरकर, ज्ञानेबा पडीले, आदी उपस्थित होते. 

——–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]