23.7 C
Pune
Friday, June 13, 2025
Homeठळक बातम्याविविध मार्गाचे नामकरण

विविध मार्गाचे नामकरण

आ. संभाजी पाटील निलंगेेकरांच्या उपस्थितीत लातूर शहरातील विविध मार्गांचे नामकरण


लातूर/प्रतिनिधी ः-

लातूर शहरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍यांची यादी मोठी आहे. या व्यक्तींचे स्मरण व त्यांच्या कार्याची प्रेरणा सातत्याने मिळावी या उद्देशाने शहरातील विविध मार्गांना त्या व्यक्तींचे नाव देण्यात येत आहे. शहर महानगरपालिकेच्या वतीने व आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत लातूर शहरातील विविध मार्गांचे नामकरण करण्यात आले असून यामध्ये स्वातंत्र्य सैनिक, स्व. दिगंबरराव शिवनगीकर, माजी सहकार मंत्री स्व. केशवराव सोनवणे व कै. मल्लिकार्जुन बिडवे या मार्गांचा समावेश आहे. या मार्गाला देण्यात आलेल्या नावांच्या फलकाचे अनावरण आ. निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.


विशेषतः विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान असणार्‍यांचे नाव मार्गांना देण्याची प्रथा पालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेली आहे. जेनेकरून या व्यक्तींचे स्मरण आणि त्यांच्या कामांची प्रेरणा सातत्याने लातूरकरांना मिळावी हाच मुळ उद्देश आहे. मनपाचे स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपती यांच्या पुढाकारातून शहरातील कांही मार्गांचे नामकरण करण्यात आले आहे. महात्मा गांधी चौक ते औसा हनुमान मंदिर या मार्गाला स्वातंत्र्य सैनिक स्व. दिगंबरराव शिवनगीकर, महात्मा गांधी चौक ते लोकमान्य टिळक चौक या मार्गाला माजी सहकार मंत्री स्व. केशवराव सोनवणे तर गोलाई परिसरातील एका मार्गास कै. मल्किार्जुन बिडवे असे नामकरण करण्यात आलेले आहे. या मार्गावर लावण्यात आलेल्या नामकरण फलकाचे अनावरण माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आ. निलंगेकर यांनी लातूर शहरात केंद्र सरकारसह राज्यात भाजपची सत्ता असताना अनेक विकास कामांची मुहुर्तमेढ रोवली गेली असून यातील अनेक कामे पुर्णसुद्धा झालेली आहेत. त्याचबरोबर शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मात्र गेल्या दोन वर्षात राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता आणि मनपात काँग्रेसची सत्ता असुनही एक रुपयाचा निधीही विकासकामांसाठी प्राप्त झालेला नसून केवळ मोठ-मोठ्या घोषणा करण्यात येत आहेत. या माध्यमातून लातूरकरांची दिशाभूल करण्याचे काम सुरु असून लातूरकर मात्र यास भुलणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला.


या नामकरण फलकांच्या अनावरण प्रसंगी खा. सुधाकर श्रृंगारे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य शैलेश लाहोटी, संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. दिपक मठपती, मनपा गटनेते अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शिवनगीकर, सोनवणे व बिडवे कुटूंबीय उपस्थित होते.


महाकाल प्रतिष्ठानच्या शोभायात्रेत सहभाग
दरवर्षी महाकाल प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून शोभायात्रा व पालखी काढण्यात येते. या शोभायात्रेत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सहभाग नोंदवून पालखीची पुजा करत महाआरती केली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्य यांनी आ. निलंगेकरांसह भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवक यांचे स्वागत केले. या शोभायात्रेत सहभागी होताना आ. निलंगेकरांनी डमरु वाजवत तरुणांना साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

विश्वास डिग्गीकर on

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]