मुंबई ; ( विशेष प्रतिनिधी ) –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आ. रमेशआप्पा कराड यांची रेणापूरसह विविध विकास कामाबाबत चर्चा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज गुरुवारी मुंबई येथील वर्षा बंगल्यावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी भेट घेऊन रेणापूर शहरासह लातूर ग्रामीण जिल्ह्यातील विकास कामाबाबत चर्चा करून विविध मागण्यांचे निवेदन दिले असता मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला.

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ .रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री . एकनाथराव शिंदे यांची मुंबई येथील त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या शिष्टमंडळात औसा येथील आ .अभिमन्यू पवार, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, प्रदेशाचे अमोल पाटील, रेणापूर येथील माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. तत्पूर्वी शिष्टमंडळाने वर्षा बंगल्यावरील श्रीगणेशाचे भक्ती भावे दर्शन घेतले.

रेणापूर येथे नवीन नगरपंचायत कार्यालय इमारत नियोजित व्यापारी संकुल आणि शहरातील मूलभूत सोयी सुविधा करिता निधी उपलब्ध करून द्यावा त्याचबरोबर लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या बाबतीत सविस्तर चर्चा करून विविध विकास कामांना मंजुरी देण्याची आ रमेशआप्पा कराड यांनी निवेदनाद्वारे मागणी केली असता मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेस यांनी निश्चितच विकास कामांना भरीव निधी देऊन विविध विकास कामांना गती दिली जाईल असे बोलून दाखविले.
