20.8 C
Pune
Wednesday, December 17, 2025
Homeसांस्कृतिकविविध सांस्कृतिक पुरस्कारांची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून घोषणा

विविध सांस्कृतिक पुरस्कारांची सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून घोषणा

चित्रपट/नाटक/संगीत यांचे समीक्षण करणाऱ्यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई, दि. 31: सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज मंत्रालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेदरम्यान विविध पुरस्कार घोषित करीत असतानाच चित्रपट/नाटक/संगीत यांचे समीक्षण करणाऱ्यांचाही सन्मान करण्याचा शासनाचा विचार असल्याचेही यावेळी श्री. देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रातील गायन/संगीत या कलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांना दरवर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो.  सन सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार पं.हरिप्रसाद चौरसिया यांना जाहीर करण्यात आला आहे.  शास्त्रीय संगीत क्षेत्रात गायन आणि वादन यामध्ये प्रदीर्घकाळ उल्लेखनीय कार्य केलेलया कलाकारांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार दिला जातो.  सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार दिवंगत पंडित शिवकुमार शर्मा यांना जाहीर करण्यात आला आहे.लोककलाक्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारास विठाबाई नारायणगांवकर जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. सन 2019-20 या वर्षाचा पुरस्कार आतांबर शिरढोणकर यांना तर सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार संध्या माने यांना जाहीर करण्यात आला आहे. रंगभूमीवरील प्रदीर्घ सेवा केलेल्या जेष्ठ नाट्य कलाकारास नटवर्य प्रभाकर पणशीकर यांच्या नावे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार देण्यात येतो. सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार  दत्ता भगत यांना तर सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार सतिश आळेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. संगीत रंगभूमीवरील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकारास दरवर्षी संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. सन 2020-21 या वर्षाचा पुरस्कार  लता शिलेदार ऊर्फ दिप्ती भोगले यांना तर सन 2021-22 या वर्षाचा पुरस्कार सुधीर ठाकुर यांना जाहीर करण्यात आला आहे. या पाचही पुरस्काराचे स्वरुप 5 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असे आहे.

याच पत्रकार परिषदेत सांस्कृतिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या कलावंत व्यक्तींना सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप 1 लाख रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. नाटक या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी कुमार सोहोनी आणि सन 2020-21 साठी गंगाराम गवाणकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कंठसंगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी पंडितकुमार सुरुसे आणि सन 2020-21 साठी कल्याणजी गायकवाड यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उपशास्त्रीय संगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शौनक अभिषेकी आणि सन 2020-21 साठी देवकी पंडित यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. वाद्यसंगीत या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी सुभाष खरोटे आणि सन 2020-21 साठी ओमकार गुलवडी यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मराठी चित्रपटासाठी सन 2019-20 साठी मधु कांबीकर आणि सन 2020-21 साठी वसंत इंगळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. किर्तन/समाजप्रबोधन या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी ज्ञानेश्वर वाबळे आणि सन 2020-21 साठी गुरुबाबा औसेकर यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तमाशा या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शिवाजी थोरात आणि सन 2020-21 साठी सुरेश काळे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शाहिरी या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शाहीर अवधुत विभूते आणि सन 2020-21 साठी कैलासवासी शाहीर कृष्णकांत जाधव यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नृत्य या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी शुभदा वराडकर आणि सन 2020-21 साठी जयश्री राजगोपालन यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लोककला या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी सरला नांदुलेकर आणि सन 2020-21 साठी कमलबाई शिंदे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आदिवासी गिरीजन या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी मोहन मेश्राम आणि सन 2020-21 साठी गणपत मसगे यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कलादान या क्षेत्रासाठी सन 2019-20 साठी अन्वर कुरेशी आणि सन 2020-21 साठी देवेंद्र दोडके यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आज जाहीर करण्यात आलेले पुरस्कार लवकरच या सर्व पुरस्कारार्थींना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येतील असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]