विशेष सत्कार

0
275

*कायम समाजाच्या उपयोगी यावे*

दिलीपराव देशमुख यांचे आवाहन; सेवापूर्ती ऋणनिर्देश समारंभात युवराज थडकर यांचा विशेष सत्कार…..

लातूर,-(प्रतिनिधी)- एखाद्या क्षेत्रातील सेवेचा कालखंड संपतो. पण, माणूस निवृत्त कधीच होत नसतो. सेवाकाळ संपल्यानंतर आवडीचे कार्य हाती घेऊन कायम समाजाच्या उपयोगी पडावे, असे आवाहन माजी मंत्री, सहकारमहर्षी श्री. दिलीपराव देशमुख यांनी येथे केले. लोकांकडून मिळणारी चांगुलपणाची थाप ही खरी सेवापूर्ती असते, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या निलंगा आगाराचे आगार व्यवस्थापक श्री. युवराज भानुदास थडकर यांच्या सेवापूर्ती निमित्त सेवापूर्ती ऋणनिर्देश समारंभात श्री. दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. देशमुख बोलत होते. याप्रसंगी बाभळगावातील अनेक जुन्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्री. श्रीपतराव काकडे, श्री. संभाजी सुळ, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्री. सचिन क्षीरसागर, सेवानिवृत्त यंत्र अभियंता कालिदास लांडगे उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, थडकर कुटुंबीय हे मूळचे बाभळगावचे. युवराज थडकर आणि त्यांचे बंधू मोठ्या कष्टाने, जिद्दीने पुढे आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात त्यांनी निष्ठेने व नम्रतेने सेवा केली. संकटांना शांतपणे सामोरे गेले. सेवापूर्तीनंतर आता थडकर यांनी शिक्षण क्षेत्राकडे वळावे. ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. त्यांच्यातील टायलेंट ओळखून त्यांना योग्य दिशा द्यावी. अशा प्रयत्नांतून ग्रामीण भागातील मुले-मुली वेगवेगळ्या क्षेत्रात चमकतील.

पहिला आशीर्वाद बाभळगावचा :

आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना पहिला आशीर्वाद बाभळगावातील ग्रामस्थांनी दिला. म्हणून साहेब पुढे एका विशिष्ट उंचीपर्यंत जावू शकले आणि त्यांच्यासोबत आपल्या सर्वांना पुढे जाता आले. हे कधीही विसरता येणार नाही. बाभळगावात जवळजवळ सर्व जाती-धर्माची घरे आहेत. येथे एकता, समानता पिढ्यानपिढ्या जपली जात आहे. याचे खरे स्वरूप हे दसऱ्याच्या दिवशी समजायचे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे भाषण व्हायचे. एकत्र येऊन सिमोल्लंघन व्हायचे. एकतेचा तो वारसा आजही आपण जपून ठेवला आहे, अशा आठवणीही श्री. दिलीपराव देशमुख यांनी उलगडल्या.

यावेळी सेवानिवृत्त प्रादेशिक अभियंता रंगनाथ गायकवाड, रामचंद्र तोडकर, चंद्रकांत थडकर, सूर्यकांत थडकर, महादेव भंडारे, हणमंत तोडकर, सुरेश देशमुख, अविनाश देशमुख, गोपाळ थडकर, मुक्ताराम पिल्ले, डॉ. भारत थडकर, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. किरण तोडकरी, डॉ. संतोष माळी, डॉ. पूजा माळी, राजेसाहेब देशमुख, जीवनराव देशमुख, सावता माळी, भीमाशंकर हिरमुखे, बाबुराव शिंदे, विश्वनाथ तोडकरी, अरुण लोणकर, दिनकर पहुरकर, व्यंकट बिराजदार, विजय बनसोडे, बलभीम पुरी, शिवाजी सन्मुखराव उपस्थित होते.

हा क्षण स्वल्पविरामासारखा

महाराष्ट्र्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात युवराज थडकर यांनी निष्ठापूर्वक सेवा बजावली. कार्यकुशलतेने वेगवेगळी जबाबदारी सांभाळली. सेवेतून निवृत्त होणे हा आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि तितकाच भावनिक क्षण असला तरी तो एखाद्या स्वल्पविरामासारखा आहे. आपण यापुढेही त्याच निष्ठेने आणि त्याच ऊर्जेने आवडीच्या क्षेत्रात कार्यरत रहावे, अशा शुभेच्छा आमदार श्री. धिरज देशमुख यांनी पत्राद्वारे श्री. थडकर यांना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here