विश्वंभर गव्हाणे ” गुरुगौरव ” पुरस्काराने सन्मानित !
उदगीर दि. . शैक्षणिक व सामाजिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल शिक्षण विभाग पंचायत समिती उदगीरच्या वतीने येथील सुवर्णामाता देशमुख कन्या विद्यालयातील सहशिक्षक विश्वंभर केशवराव गव्हाणे यांचा तालुकास्तरीय ” गुरूगौरव ”
पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या ” बाला ” या उपक्रमाअंतर्गत केलेल्या कार्याची यावेळी विशेष दखल घेण्यात आली. भगीरथी मंगल कार्यालयात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते सपत्नीक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती डॉ. शिवाजीराव मुळे होते. प्रास्ताविक गटविकास अधिकारी महेश सुळे यांनी केले. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे, नीता मोरे, ज्ञानोबा मुंडे यांनी केले तर आभार गटशिक्षणाधिकारी नितिन लोहकरे यांनी मानले.











