*शहीद नायक नागनाथ लोभे यांचे वीरपिता / वीरपत्नी यांना शासकीय निधीतून 50 लाखाचा धनादेश पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सुपूर्द*
निलंगा,-(प्रशांत साळुंके)- निलंगा तालुक्यातील उमरगा (हाडगा) येथील नायक लोभे नागनाथ अभंग 106 इंजिनिअर रेजिमेंट मध्य पूर्व सिक्किम येथे नियंत्रण रेषेवर ( ऑपरेशन स्नो लिओपार्ड ) कार्यरत असताना दि.20 डिसेंबर 2020 रोजी शहीद झाले. असून शहीद जवानांच्या अवलंबिताना महाराष्ट्र शासनामार्फत आर्थिक मदत म्हणून 1 कोटीची एकरकमी अनुदान देण्यात येते. त्यापैकी पन्नास टक्के अनुदान मुख्यमंत्री सहायता निधीतून रक्कम 50 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. त्यापैकी उर्वरित आर्थिक मदतीची रक्कम 50 लाख रुपयांचा धनादेश वीरपिता अभंग नागा लोभे व वीरपत्नी श्रीमती स्वाती नागनाथ लोभे यांना आज बैठकीत प्रदान करण्यात आला.
यावेळी आमदार धिरज देशमुख, पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, जिल्हा नियोजन समिती सदस्य अभय साळुंके, जिल्हा नियोजन समिती सदस्य लिंबन महाराज रेश्मे आदीची उपस्थिती होती.











