*राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणारे
वीरयौध्दे कॅप्टन कृष्णकांत*
– राजेय कुलकर्णी
उदगीर-() “कोणत्याही राष्ट्राला शस्त्रसज्ज सेनेपेक्षा राष्ट्रसमर्पित,धाडशी व देशप्रेमी नागरिकांची गरज असते.मातृभूमी संकटात असताना जीवाची पर्वा न करता मृत्यू अंगावर घेऊन शत्रूशी दोन हात करणारे कँप्टन कृष्णकांत हुतात्मा झाले”,असे प्रतिपादन कॕप्टन कृष्णकांत यांचे वर्गमित्र व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राजेय कुलकर्णी यांनी लालबहादुर शास्त्री विद्यालयाच्या शहिद दिनाच्या कार्यक्रमात केले.
संस्थेचे माजी विद्यार्थी, कारगिल युध्दात वीरमरण आलेल्या शहिद कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या स्मृती दिनानिमित्त कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच शहीद दिनाचे औचित्य साधून कोविडयौद्धे म्हणून कँप्टन कृष्णकांत यांचे लहान बंधू नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर व त्यांच्या पत्नी सारीका धाराशिवकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका अंबूताई दीक्षित,उपमुख्याध्यापक आंबादास गायकवाड,कृष्णा व संस्कारिका धाराशिवकर उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधव मठवाले ,सूत्रसंचालन निता मोरे व देशभक्तीपरगीत शिल्पा सेलूकर यांनी गायले तसेच आभार पर्यवेक्षक लालासाहेब गुळभिले यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिता मुळखेडे,अनिता यलमटे ,सुलक्षणा गंगथडे ,गुरूदत्त महामुनी व संतोष कोले यांनी परिश्रम घेतले.यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.











