वृक्ष लागवड शुभारंभ

0
339

 

विलासराव देशमुख फाऊंडेशन, लातूर वृक्ष चळवळ

व ग्रामपंचायत हरंगुळ खु. यांच्या पुढाकारातून

५०० वृक्ष लागवडीचा‌ शुभारंभ

लातूर प्रतिनिधी (शुक्रवार दि. 3 सप्टेंबर २१)

लातूर शहरासह जिल्हाभरात पर्यावरण संर्वधनासाठी वृक्षारोपन मोहिम मोठया प्रमाणात राबविली जात आहे. यामध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी विलासराव देशमुख फाऊंडेशन, लातूर वृक्ष चळवळ व विविध ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने वृक्ष लागवड मोहिम मोठया प्रमाणाम राबवीली जात आहे. या अंतर्गत शुक्रवार दि. ३ सप्टेंबर रोजी ट्वेंटी वनच्या संचालिका सौ. अदितीताई देशमुख यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत हरंगुळ खु. यांच्या पुढाकारातून ५०० वृक्षांची लागवडीचा‌ शुभारंभ करण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात येत आहे. ही मोहिम सन २०१५-१६ पासून राबविली जात आहे. सर्वप्रथम लातूर शहरातल्या मुख्य रस्त्यावर वृक्ष लागवड करून तिचे संवर्धन करण्याम आले. विकासरत्न विलासराव देशमुख मार्ग या ठिकाणी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन केले गेले. तसेच मुरुड अकोला ते निवळी, लातूर शहरातील दुभाजकालामध्ये लातूर मनपाच्या मदतीने एक शहराची ग्रीन पॉलिसी बनवण्यात आली. आणि इतर संस्थांचा सहभाग घेऊन दुभाजकामध्ये वृक्ष लागवड व संवर्धन करण्यात आले. मागील दोन वर्षात शहरांमध्ये २२ ऑक्सिजन झोन प्रकल्प तयार करण्यात आले. सदया लातूर तालुक्यातील अनेक गावातून स्थानिक पातळीवर वृक्ष चळवळ समिती गठन करून कार्य सुरू करण्यात आले आहे. कासारगाव, पाखरसांगवी, हरंगुळ खुर्द, सिकंदरपुर, वांजरखेडा, काटगाव, बोपला, बोकणगांव, खरोळा येथे स्थानिक वृक्षसंवर्धन समिती गठन करून स्थानिक तरुणांच्या व ग्रामपंचायतच्या सहकार्याने वृक्ष चळवळीचे कार्य केले जात आहे. श्रमदानातून वृक्षरोपण व संवर्धनातून अनेक गावात लातूर वृक्ष चळवळीचे‌ कार्य उभे राहात आहे.

आज मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपाने नैसर्गिक साधनसंपत्तीचे ओरबाडणे सुरू झाले. पूर्वी या देशात निबिड अरण्ये होती. ती तुटली आणि तेथे सिमेंटची जंगले उभी राहिली. त्याचा परिणाम पावसाच्या चक्रावर झाला. झाडेच नाहीत म्हटल्यावर कसा पडणार पाऊस? त्यामुळे धरती तापू लागली. ग्लोबल वॉर्मिगचा परीणाम, वातावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले. एलनिनोचे संकट उभे राहिले. समुद्रातले प्रवाहही विचित्र वागू लागले आणि सगळेच बिघडले. हा बिघाड पृथ्वीला कडेलोटाच्या टोकावर घेऊन चालला आहे. या सर्वांचा विचार करून लातूर शहरासह जिल्हाभरात वृक्ष लागवड मोहिम राबवीली जात आहे.

हरंगुळ खु. येथील वृक्षलागवड कार्यक्रमासाठी विलासराव देशमुख फाऊंडेशनचे समन्वयक संगीता मोळवणे, लातूर वृक्षचे समन्वयक सुपर्ण जगताप, सरपंच दादाराव पवार, उपसरपंच धनराज पाटील, अॅड. बालाजी इंगळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक उस्तुरगे, अमीर शेख, गजानन बोयणे शिक्षक गावकरी हे उपस्थित होते. यावेळी उत्साहाच्या वातावरणात वृक्ष संवर्धनाच्या घोषणा देण्यात आल्या.

लातूर वृक्ष तर्फे वाळवंटीकरण व दुष्काळ विरोधात तसेच येत्या काळातील संभाव्य धोके ओळखुन काळाची गरज लक्षात घेता” वृक्षारोपण व संवर्धनाची” आवश्यकता आहे असे लातूर वृक्ष चळवळीचे समन्वयक सुपर्ण जगताप यांनी या प्रसंगी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here