रामलिंगप्पा संभाजी बुरकूले यांचे वृृध्दापकाळाने निधन
ऐन दसर्यादिवशी निधन झाल्याने ; निटूर व परिसरात हळहळ व्यक्त….
निलंगा,-(प्रतिनिधी )- निलंगा तालुक्यातील निटूर येथील शिवाजी विद्यालयाचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते रामलिंगप्पा संभाजी बुरकूले यांचे दि.15 रोजी चार वाजता वृृृध्दापकाळाने निधन झाले त्यांचे ( वय-90 ) होते.त्यांच्यावर निटूर येथे दि.16 रोजी दुपारी साठेबाराच्या दरम्यान त्यांच्या शेतात पार्थिवावर बेलपञी वाहुन अंन्त्यविधी करण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,तीन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.प्रसाद बुरकूले आणि संजय बुरकूले यांचे ते वडील होते.
त्यांच्या अंन्त्यविधीच्या श्रध्दांजलीत शिवसेनेचे विनोद आर्य,संगांयोचे सदस्य सुरेंद्र धुमाळ,भाजपा लातूर सचिव पंकज कुलकर्णी,सरपंच परमेश्वर हासबे,उपसरपंच संगमेश्वर करंजे,दिनकर निटूरे,बालाजी आंबेगावे,नंदकुमार हासबे,अशोक हासबे,अनिल सोमवंशी,बाळकृृष्ण डांगे,अँड.नारायण सोमवंशी आदी जणांची उपस्थिती होती.











