एक शिस्तप्रिय अधिकारी..
डेप्युटी कमिशनर डॉ.शरद कुलकर्णी
माझा मामेभाऊ डॉ.शरद कुलकर्णी हा प्रमोशनवर अमरावती येथे डेप्युटी कमिशनर म्हणून जात आहे..एक सजग आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्याची ओळख आहे..जिथे जाईल तिथे त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे..निलंगा येथून गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली,कार्यालयीन कामात स्वतःला झोकून देऊन ग्रामीण भागातील योजना राबविण्यासठी त्यांनी काम केले..कर्मचाऱ्यासोबत असलेले त्यांचे संबंध खर तर अधिकाऱ्याना विचार करायला लावणारा विषय आहे..प्रशासकीय कामात आपला वेगळा ठसा उमवटावणारा हा अधिकारी ग्रामीण भागाची नस ओळखून काम करणारा आहे..पदाचा कुठेही लवलेश नसलेला,जिल्हापरिषद म्हणजे राजकीय रेलचेल असलेला प्रांत मात्र शरद कुलकर्णी यांनी राजकीय आणि सामाजिक जाणिवा जपत अनेक कार्यक्रम त्या त्या भागात राबवले.. खरं तर त्याच शिक्षण पशु वैद्यकीयमध्ये झाले,डॉक्टर होण्याची इच्छा होती मात्र परभणीला प्रवेश मिळाला आणि त्याच्या जीवनाला प्रशासकीय वळण लागले..पहिल्याच परीक्षेत एमपीएससी पास होऊन शरदने प्रशासनात जाण्याचा निर्णय घेतला,डेप्युटी सीईओ होऊन त्याने आमच्या कुटुंबाची मान उंचावली..

आमची परिस्थिती बेताची असल्याने शरदच्या वडिलांच्या म्हणजेच माझ्या मामाची मदत आम्हाला होतीच..माझा आणि शरदचा जन्म काही दिवसाच्या फरकाचा त्यामुळे माझे बालपण बऱ्याचअंशी मामाकडे गेले..महाराष्ट्रात 1972 ला कोरडा दुष्काळ पडला,मामाने मला आणि आईला औरंगाबादला नेले..माझी बालवाडी शरद सोबत औरंगाबादला सुरू झाली..शरद सुरुवातीपासून वर्गात पहिला त्यामुळे शिक्षकांचा लाडका..पुन्हा दुष्काळ संपल्यावर मी गावाकडे आलो..माझा शाळेत प्रवेश पहिल्या वर्गात होण्याऐवजी पुन्हा बालवाडीत झाला..आमच्या दोघांच्या शिक्षणात एक वर्षाचा फरक पडला त्यामुळे शरदची सगळी पुस्तके,वह्या दहावी पर्यंत न फाटता बायडिंग करून जेवरीला येऊ लागली..हा लळा पुढे कायम राहिला,आयुष्यातील सगळे महत्वाचे निर्णय,माझ्या आणि शरदच्या आम्ही मिळून घेऊ लागलो..आजही काहीही वाटले तरी तो धागा आम्ही तुटू दिला नाही..शरद आता डेप्युटी कमिशनर म्हणून जॉईन होत आहे..आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर त्याने स्वतःची उंची वाढवण्याचे काम केले आहे..एक शिस्त त्याच्या वागण्यात असते,कामाची प्रचंड उरक असलेला,आपले पद आणि प्रतिष्ठा सतत जपत काम करत आलेला हा अधिकारी आहे..प्रचंड वाचन असलेला,अनेक पुस्तके मी त्याच्या लायब्ररीतून ढापली आहेत..वाचनाची आवड,ऑफिसात वेळ मिळाला नसला की घरी फायली आणून त्या त्या वेळेत काम पूर्ण करणारा,स्पष्टवक्ता असलेला हा अधिकारी असाच मोठा होत राहो..त्याच्या पदाला शोभेल असेच कर्तृत्व त्याच्या हातून घडत राहो..त्यालाही या पदातून वेगळे काही शिकता येणार आहे…त्याची कारकीर्द नक्कीच गाजेल असा विश्वास आम्हाला आहे..तुझी शिस्त प्रशासनातील सगळ्यांच्या अंगी यावी हीच सदिच्छा..तुला आभाळभर शुभेच्छा,नव्या ईनिंगसाठी अभिनंदन…

लेखन : @ संजय जेवरीकर
पत्रकार,सरपंच











