विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्रातील संधी यावर मान्यवरांचे मार्गदर्शन.
लातूर प्रतिनिधी-
सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या लातूरच्या विलासराव देशमुख फौंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, व्हीडीएफ स्कुल ऑफ फार्मसी कडून चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ प्रवेशित बी.फार्मसी प्रथम वर्ष, एम फार्मसी प्रथम वर्ष यासह बी फार्मसी थेट द्वितीय वर्ष विद्यार्थ्यासाठी (इंडक्शन प्रोग्राम) प्रेरण कार्यक्रम मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना लातूरचे तहसीलदार स्वप्नील पवार यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्माण शास्त्र शाखेत तसेच स्पर्धा परीक्षा, खेळ, संभाषण कौशल्य यासह आदी क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी याबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच आगामी काळातील स्पर्धात्मक युग पाहता यासाठी विद्यार्थ्यानी तयार राहावे असे आवाहन करीत सविस्तर असे मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना पुरणमल शासकीय तंत्र निकेतन उप प्राचार्य डॉ.संतोष कुलकर्णी म्हणाले की, औषधनिर्माणशास्त्र या विद्या शाखेत विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या संधी असून याचा विद्यार्थ्यानी फायदा करून घ्यावा.
विलासराव देशमुख फौंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन, व्हीडीएफ स्कुल ऑफ फार्मसी लातूर कडून विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळावे तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण याकरिता महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जातात या उपक्रमाची तसेच महाविद्यालयाची गुणवत्ता याविषयी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.वाकुरे यांनी माहिती दिली.

या वेळी पालक,विद्यार्थी, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
———————————–