तालुकाध्यक्षपदी विजय बिराजदार, तर कार्याध्यक्ष विलास तपासे
औसा – व्हॉईस ऑफ मीडियाची औसा तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून या कार्यकारिणी औसा तालुकाध्यक्ष पदी विजय बिराजदार तर कार्याध्यक्षपदी विलास तपासे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत सर्व स्तरावरून होत आहे.

व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेची औसा तालुका कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष बालाजी फड व जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार आणि सुशांत सांगवे यांनी जाहीर केली आहे. या संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी पत्रकार विजय बिराजदार यांची, तर कार्याध्यक्षपदी विलास तपासे यांची निवड करण्यात आली आहे.
‘

‘ लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा ‘ असे ब्रीद घेऊन राष्ट्रीय पातळीवर स्थापन झालेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे जाळे अवघ्या वर्षभरात महाराष्ट्रासह २१ राज्यांमध्ये पसरले आहे. संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय सरचिणीस चंद्रमोहन पुप्पाला, राज्य अध्यक्ष राजा माने व मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या सूचनेवरुन औसा तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
या कार्यकारिणीत अध्यक्षपदी विजय बिराजदार, कार्याध्यक्षपदी विलास तपासे यांच्यासह उपाध्यक्षपदी रामकृष्ण जाधव व समाधान कोळी, सरचिटणीसपदी गौस शेख, सहसरचिटणीसपदी कैलास कुंभार, खजिनदार/कोषाध्यक्षपदी वैजनाथ कांबळे, कार्यवाहकपदी किशोर जाधव, संघटकपदी विनायक मोरे, प्रसिद्धी प्रमुखपदी कलिम शाह, तर सदस्य म्हणून बाळासाहेब कुलकर्णी यांची नियुक्ती केली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.