*निलंगा तालुक्यातील 100 टक्के कोरोना लसीकरण करणारे पहिले गाव आनंदवाडी गौर*
निलंंगा,-(प्रशांत साळुंके)- निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गौर हे गाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मसलगा अंतर्गत येत असून या गावाने आज गावातील नागरिकांचे 100 टक्के कोविड लसीकरण करुन घेतले आहे.
यासाठी मसलगा उपकेंद्राच्या डॉ. अश्विनी शिंदे, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, गावच्या सरपंच वर्षा विष्णु चामे, उपसरपंच विमल जोतिराम नागमोडे, सदस्य सगुणा, राधिका चामे, वनीता चवरे, शालूबाई चामे, तंटामुक्त समिती अध्यक्ष आयोध्या चामे, माजी सरपंच ज्ञानोबा चामे, विष्णु चामे, राम चवरे आदीनी परिश्रम घेतले.