28.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeराजकीय*शहरांत कांग्रेस पक्षाचा शक्ती प्रदर्शन, नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले!*

*शहरांत कांग्रेस पक्षाचा शक्ती प्रदर्शन, नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले!*

निलंगा/ (प्रतिनिधी)
निलंगा येथे निलंगा शहर कांग्रेसच्या वतीने येणाऱ्या नगर पालिकेच्या निवडणुकीमध्ये रणनीती आखण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस पक्षाचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली नक्षत्र मंगल कार्यालय येथे बैठक संपन्न झाली..
याबैठकीला पक्ष निरीक्षक म्हणून लातूर महानगरपालिकेचे माजी महापौर दीपक सुळ हे आवर्जून उपस्थित होते.यावेळी मंचावर तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील,शहर अध्यक्ष गोविंद शिंगाडे,महंमदखा पठाण, जेष्ठ विधीज्ञ जी बी सूर्यवंशी, हमीद शेख, अजित माने, प्रा-दयानंद चोपणे, सिराज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते..


पक्ष निरीक्षक दीपक सुळ यावेळी म्हणाले की मी अशोकरांवना दुरून पहिले होते. परंतू आज प्रत्येक्षात अशोकराव यांच्यावर कार्यकर्त्यांचा प्रेम आणि निष्ठा पाहून मी खरंच भारावून गेलो.भैय्या यांच्या भोळ्या स्वभावचा गैरफायदा वरच्या वाड्यातील काही मंडळी घेऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर मागाल्या दारातून आपली भेट घेऊन आम्ही एकच आहोत आमचं ठरलंय असं गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये चारही बाजूने संमभ्रम निर्माण करतात.तो राजकीय डावपेच हाणून पाडून दादासाहेबांनी कमवलेले नाते, जमवलेल्या निष्ठावंत कार्यकर्ते हेच माझे खरे नाते समजून तुम्हाला लोकं भोळा शंकर म्हणतात भोळा शँकराला विनंती की अता तिसरा डोळा उघडा.दादांच्या विचारांचा नगर परिषदेवर पगडा राहू द्या.कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सुळ म्हणाले की नगर परिषदेवर कांग्रेस पक्षाचा झेंडा फडकावून अशोकराव भैय्या पाटील यांच्या आमदारकीसाठी अशोकराव यांचे हात मजबूत करणे गरजेचे आहे.
पालकमंत्री अमित भैय्या देशमुख व अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या मैत्रीची जवळीकता किती घट आहे हे मी आपल्या डोळ्याने पाहिले आहे. याचा विचार करून कार्यकर्त्यांनी गट तट बाजूला सारून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कांग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आजपासूनच डोअर टू डोअर जनतेत जाऊन काम केले पाहिजे असे सुळ म्हणाले.


अध्यक्षीय समारोप भाषण करताना अशोकराव म्हणाले की कै-डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर, कै-विलासराव देशमुख व शिवराज पाटील चाकूरकर यांचा विचारांची पेरणा घेऊन निलंगेकर साहेबांच्या राहिलेल्या अपुऱ्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी माझ्या स्वभावामध्ये बद्दल करून “आरे ला कारे”म्हणून जश्याच्या तश्या उत्तर देणार नात्या पेक्षा दादांनी घडविलेल्या कार्यकर्ता हा जिवा पेक्षा मोठा आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून कांग्रेस पक्षामध्ये कोणी गद्दारी करत असाल तर त्याला खड्या सारखे पक्षातून बाहेर फेंकून देणार.मीच उमेदवार म्हणून काम करण्यासाठी एकत्रित यावा. माझ्या स्वभावामध्ये बद्दल करत राजकीय पवित्रा हातात घेऊन पुढच्या निवडणुकीमध्ये काम करणार असल्याचे यावेळी अशोकराव पाटील यांनी आवर्जून सांगितले.राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून खूप चांगलं काम होत असून स्थानिक पातळीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीचा विचार सर्वानामुते आपण ठरू या. तूर्तास सर्वांनी कामाला लागा. असे निर्देश अशोकराव यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले.
माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांनी प्रभाग रचनेची व आरक्षण सोडतीची सविस्तर माहिती सभागृहाला दिली.सदरील बैठकीत कांग्रेस पक्षाचे शक्ती प्रदर्शन करत येणाऱ्या नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे सांगितले जाते..
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा-दयानंद चोपणे करीत असताना त्यांनी बैठकी मध्ये प्रस्ताव मांडला की उमेदवार निवडीची व आघाडी करण्याचे सर्व अधिकार हे कांग्रेस पक्षाचे नेते अशोकराव पाटील यांना देण्यात यावे यावेळी उपस्थित सभागृहातील मंचावरील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रस्तावास अनुमोदन टाळ्यांच्या गजरात दिले.या बैठकीला आजी माजी नगराध्यक्ष आजी माजी नगरसेवक,व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]