26.3 C
Pune
Wednesday, October 29, 2025
Homeठळक बातम्याशहीद जवानांच्या कुटुंबियांना १कोटीची मदत

शहीद जवानांच्या कुटुंबियांना १कोटीची मदत

शहीद जवान गणपती सुरेश लांडगे यांच्या आई – वडील आणि पत्नी यांना मुख्यमंत्री सहाय्यता / शासकीय निधीतून 1 कोटीची आर्थिक मदत

लातूर दि. 28 ( जिमाका ):-

सैन्य न. 4587389 एन. शिपाई लांडगे गणवती सुरेश रा. लोदगा ता. औसा जि. लातूर हे 6 महार रेजिमेंटमध्ये जम्मु काश्मिर येथे लद्दाख सेक्टरमधील अति उंच ठिकाणी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ऑपरेशन ड्युटीवर कर्तव्य बजावताना शहिद झाले. शहिद जवानांच्या अवलंबितांना महाराष्ट्र शासनामार्फत आर्थिक मदत म्हणून एक कोटी एकरकमी अनुदान देण्यात येते. त्यापैकी 50 टक्के अनुदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून व 50 टक्के अनुदान शासकीय निधीतून दिले जाते. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे अनुदान रक्कम रुपये पन्नास लाख व शासकीय अनुदानाची रक्कम पन्नास लाख असे एकूण 1 कोटी रुपयांचे धनादेश पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
औसा तालुक्यातील लोदगा येथील शहीद शिपाई लांडगे गणपती शिवाजी यांच्या वीरमाता-वीरपिता व पत्नी अनिता लांडगे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 50 लाख तर शासकीय सहाय्यत्तामधून 50 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


शहीद शिपाई लांडगे गणपती शिवाजी यांचे वीरमाता – वीरपिता यांना प्रत्येकी 20 लाख रुपयांचा धनादेश, तर शहीद शिपाई लांडगे गणपती शिवाजी यांच्या पत्नी श्रीमती अनिता गणपती लांडगे यांना 60 लाख रुपयांचा धनादेश आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे उपस्थित होते.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]