शारदीय नवरात्रौत्सव

0
266

आई राजा उदो उदो’ च्या गजरात घटस्थापना  

वडवळ नागनाथ: श्रीदेवी मंदीरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

वडवळ नागनाथ: शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त येथील धनगर वाड्यातील पुर्वमुखी श्रीदेवी मंदिरात बुधवारी (दिं.६ रोजी ) रात्री पंचायत समितीचे माजी सदस्य विश्वासराव पाटील यांच्या हस्ते श्रीदेवीची धार्मिक विधी, घटस्थापना करून महाआरती करण्यात आली.

स्त्री शक्तीची आराधना आणि उपासनेचे प्रतीक असलेल्या शारदिय नवरात्रोमहोत्सवाला येथील श्रीदेवी मंदिरात बुधवारपासून सुरूवात झाली. मंत्रोच्चार, आई राजा उदो उदो..चा जयघोष आणि संबळाच्या साथीने आराध्यानी महाआरती केली. यावेळी सरपंच मुरलीधर सोनकांबळे, उपसरपंच बालाजी गंदगे, सदस्य अमित वाडकर, गणेश कोरे, माजी सरपंच हर्षवर्धन कसबे, संतोष आचवले, हणमंतराव पाटील, माणिकराव हलिंगे, विवेकानंद लवटे-पाटील, संभाजी आलुरे, महादेव आलुरे, मंदिराचे अध्यक्ष रमाकांत नवणे, उपाध्यक्ष तुकाराम कदम, कोषाध्यक्ष दत्तु आलुरे, दयानंद पाटील उपस्थित होते.

नवरात्र महोत्सवानिमित्त मंदिरावर तसेच परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भक्तांचे दुख: निवारण करणाऱ्या या देवीच्या मंदिरात घटस्थापनेनंतर भाविक दर्शनासाठी येत आहेत. महोत्सवात मंदिरात दररोज विविध धार्मिक कार्यक्रमासह वागया-मुराळी, गवळणी, भारूडे तसेच आराध्याचे कार्यक्रम होणार आहेत. यासाठी त्र्यंबक आलुरे, खंडेराव आलुरे, दिनकर आलुरे, शंकर पिटले, नागनाथ आलुरे, अंकुश आलुरे, माणिक कोरे, संतोष लवटे, नारायण कोरे, सीता आलुरे आदीजण पुढाकार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here