अ.भा.सो.क्ष.कासार समाज महिला आघाडीच्या वतीने
कासार समाजातील ४०आजी माजी शिक्षक, प्राध्यापक यांचा सन्मान
लातूर : डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त अ.भा.सो.क्ष.कासार समाज महिला आघाडी, जय कालिका मित्रमंडळ व लातूर कासार समाज यांच्या वतीने लातूर जिल्ह्यातील कासार समाजातील ४०आजी माजी शिक्षक, प्राध्यापक यांचा सन्मान करुन शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला दिपप्रज्वलन करुन कालिकामातेचे पुजन करण्यात आले. यानंतर लातूर जिल्ह्यातील कासार समाजातील ४०आजी माजी शिक्षक, प्राध्यापक यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार व कासार समाजभुषण जयप्रकाश दगडे, प्रमुख पाहुणे अ.भा.सो.क्ष.कासार समाजाचे माजी अध्यक्ष श्रीकांत (नाना) ईटकर, शिक्षण क्षेत्रात मोलाचे काम करणाऱ्या व राजर्षी शाहु महाविद्यालयाच्या माजी उपप्राचार्या सौ.स्मिताताई दगडे-दुरुगकर, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुलचे प्राचार्य बी.ए.मैंदर्गे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व ज्येष्ठ समाजसेवक मोतीचंद दुरुगकर, कालिकादेवी मंदीर संस्थान लातूरचे अध्यक्ष राघवेंद्र ईटकर, अ.भा.सो.क्ष.कासार समाज महिला जिल्हाध्यक्षा सौ.राजश्री ईटकर, अ.भा.सो.क्ष.कासार समाज युवक जिल्हाध्यक्ष भास्कर तामटे आदी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना शिक्षकामुळे एक चांगला विद्यार्थी घडतो. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षकांनी व्यापक विचार ठेऊन आपल्या कार्याशी प्रामाणिक राहुन उत्तम कार्य केल्याने एक चांगला विद्यार्थी यासोबतच राष्ट्राची, समाजाची उभारणी आणि निर्मिती करण्याचे काम शिक्षकांमुळे होते असे मत संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कुलचे प्राचार्य बी.ए.मैंदर्गे यांनी व्यक्त केले. यावेळी श्री.प्रल्हादराव नानजकर, श्रीमती संगीता फुलचंद कासार, श्री.संजय लोखंडे, प्राध्यापक अभिनंदन जंगमे, श्री. दुरुगकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ.भा.सो.क्ष.कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ महिला जिल्हाध्यक्षा महिला अध्यक्षा सौ.राजश्री ईटकर, उपाध्यक्षा सौ.सोनाली काटकर, सौ.साधना खंडाळकर, सचिव सौ.मंजुश्री कपाळे, सौ.माधवी गडदे, सौ.भाग्यश्री झरकर, कोषाध्यक्षा सौ.योगीता कंदले, सौ.राजश्री तामटे, कार्याध्यक्षा सौ.सिमा ईटकर, सौ.रोहीणी गडगडे संघटक सौ.मनिषा नानजकर, सौ.अश्विनी ईटकर, सौ.वैष्णवी कंदले, सौ.मिताली ईटकर, सौ.अश्विनी डांगरे, सौ.ज्योस्त्ना गडदे, सौ.दिपाली कंदले व सर्व महीला पदाधिकारी यांच्यासह अ.भा.सो.क्ष.कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ युवक उपाध्यक्ष श्री.अमित ईटकर, अ.भा.सो.क्ष.कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ लातूर जिल्हाध्यक्ष श्री.हरीभाऊ गडगडे, अ.भा.सो.क्ष.कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळ लातूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री.संतोष गडदे, श्री.सुधीर ईटकर, श्री.स्वप्नील कंदले, श्री.रविन्द्र ईटकर, श्री.संतोष काटकर, श्री.दयानंद कपाळे, श्री.दिनेश नान्नजकर, श्री.श्रीशैल्य गडगडे, श्री.किरण गडगडे, श्री.संकेत गडगडे, श्री.सोमेश कंदले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.मंजुश्री दयांनद कपाळे व सौ.भाग्यश्री सचिन झरकर यांनी तर आभार प्रदर्शन सौ.सिमा अमित ईटकर यांनी केले.











