लातूर :
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर च्या वतीने विविध अधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षक परिषद राज्यकोषाध्यक्ष मा. किरण भावठाणकर, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र गुरमे व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वनिता काळे यांच्या उपस्थितीमध्ये स्थाई सभाग्रह जि.प.लातूर येथे संपन्न झाला.
आपला जिल्हा विविध विकास कार्यात प्रथम आला, जि.प.चा सर्व कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी मा. अभिनव गोयल यांच्याकडे आला तसेच गोयल साहेब यांचा बाला शैक्षणिक उपक्रम पुर्ण राज्यात राबविण्याचा प्रशासनाचा विचार चालू आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी मा. गोयल साहेब यांनी विद्यार्थ्यांचा अॅक्शन प्लॅन तयार करुन विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढवता येईल, बाला शैक्षणिक उपक्रमाचे अर्धवट राहिलेले काम पुर्ण करणे उन्हाळयात ही शाळा चालू ठेवता येईल का? अशा विविध योजना व उपक्रम सांगून शिक्षकांचे कोणतीही पदोन्नती अगर एकही प्रलंबित प्रश्न ठेवणार नाही. असे सांगीतले.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय परिक्षा मंडळाचे अध्यक्ष तथा सचिव मा. सुधाकर तेलंग यांनी अनेक नाविण्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमाबद्दल शासनाचा राष्ट्रीय शैक्षणिक योजना व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले त्यावेळी हा पुरस्कार कशामुळे मिळाला. याबद्दल विचार मांडले.
प्राथमिक विभागात नव्यानेच शिक्षणाधिकारी म्हणून श्रीमती वंदना फुटाने रुजू झाले आहेत. अवघ्या काही दिवसातच अनेक प्रश्न निकाली काढत आहेत त्याच प्रमाणे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम उत्कृष्ठ घेतल्या बद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात आला त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न या बद्दल मार्गदर्शन केले.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. काळे साहेब, गिरी साहेब, उप शिक्षणाधिकारी मा. विशाल दशवंत, प.स. लातूर गट शिक्षणाधिकारी मा. संजय पंचगले, तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या उपक्रमशिल शिक्षिका श्रीमती अरुणा बिरादार व श्रीमती राजकन्या बिराजदार यांचा ही सत्कार करण्यात आला. यावेळी मा. किरण भावठाणकर, मा. अभिनव गोयल, मा. सुधाकर तेलंग, मा. श्रीमती वंदना फुटाने, मच्छिंद्र गुरमे, वनिता काळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचलन अंगद चामवाढ यांनी केले. तर आभार हणमंत गायकवाड यांनी मानले.
यावेळी मच्छिंद्र गुरमे, वनिता काळे, संदिपान माने, तोळण देशमुख, उल्का गुडे, राजकन्या गंभिरे, माया येडले, अरुणा बिराजदार, सुरेखा बस्तापुरे, शांता कोकणे, अंगद चामवाढ, संभाजी मुंढे हणमंत गायकवाड, सतीश मारकोळे, सत्यवान माचपल्ले, शिवाजी कोंडमगिरे, बाळकृष्ण कासले, अरविंद वाढकर, बालाजी पोलकर, मल्लिकार्जुन रोडगे, महेश सुर्यवंशी, श्रीनिवास येलगटे, पद्माकर आयनाले, प्रविण माने, मनोज भिसे, उध्दव सुर्यवंशी, प्रभाकर तांबे आदि पदाधिकारी उपस्थित होते.




