28.6 C
Pune
Tuesday, October 28, 2025
Homeउद्योग*शिक्षण हे नवीन सोने: आता गुंतवणूक करा उच्चशिक्षणात*

*शिक्षण हे नवीन सोने: आता गुंतवणूक करा उच्चशिक्षणात*

मुंबई – पारंपरिकरित्या ‘काहीतरी अमूल्‍य’ म्हणजे सोने किंवा अन्य किमती धातू असेच समजले जात होते. आणि सोने खरेदी करणे उत्तमच असले, तरी आपण आणखी एका मौल्यवान गोष्टीत गुंतवणुकीचा विचार करू शकतो. ही गोष्ट म्हणजे उच्चशिक्षण. उच्चशिक्षणात गुंतवणूक महत्वाची का आहे याबद्दल मार्गदर्शन करताहेत इनक्रेडचे एज्युकेशन लोन्स विभागाचे क्रेडिट अँड प्रोडक्ट प्रमुख श्री. निलांजन चत्तोराज. 

शिक्षणातील आरओआय सर्वोत्तम: तुमच्‍या शिक्षणामध्‍ये केलेल्‍या गुंतवणूकीमधून मिळालेले फायदे इतर कोणतीही गुंतवणूक देऊ शकणार नाही. योग्य शिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या पसंतीचे करिअर करू शकता आणि तुमची व तुमच्या जवळच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती सुरक्षित करू शकता.

हे केवळ अॅकॅडमिक्सपुरते मर्यादित नाही: शिक्षण केवळ अॅकॅडमिक्सपुरते मर्यादित नाही, तर ते तुम्हाला विद्यापीठातील क्लब्ज, कार्यशाळा, टीम्स, कार्यक्रम या सर्वांची ओळख करून देते. तुम्ही या सगळ्यांत भाग घेऊ शकता आणि तुमचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होण्यात याची खूप मदत होते.

शिक्षणामुळे तुमची महत्त्वाच्या व्यक्तींशी ओळख होते: जर तुम्ही एखाद्या प्रतिष्ठित विद्यापीठात रोबोटिक्स शिकत असाल, तर तुमची भेट आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या कितीतरी प्राध्यापकांशी होऊ शकते. किंवा एमबीएचे शिक्षण घेताना तुमचा परिचय नवोन्मेषकारी उद्योजकांशी होऊ शकतो. अशा व्यक्तिमत्वांच्या सहवासात राहिल्यामुळे तुम्हाला मोठी स्वप्ने बघण्याची व ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी परिश्रम घेण्याची प्रेरणा मिळते.

शिक्षणातील गुंतवणूक ही पूर्णपणे तुमच्या मालकीची असते: स्वत:च्या शिक्षणामध्ये गुंतवणूक करण्यातील सर्वोत्तम भाग म्हणजे तुम्ही जे काही शिकाल ते तुमच्याकडून कोणीच काढून घेऊ शकत नाही. तुम्ही जोवर शिक्षण कायम ठेवता आणि तुमच्या क्षेत्रातील नवीन घडामोडींनुसार स्वत:ला अद्ययावत करत जाता, तोवर तुम्हाला शिक्षणाचा व पदवीचा उपयोग होतच राहतो.

शिक्षणामुळे आर्थिक जबाबदारीची जाणीव येते: एखाद्या प्रसिद्ध संस्थेतून उच्चशिक्षण घेणे बहुतेकदा महागडे असते. मात्र यामुळे विद्यार्थ्याची शैक्षणिक कामगिरी उंचावली जाते, जेणेकरून शिक्षणात गुंतवलेला पैसा योग्य पद्धतीने उपयोगात आणला जावा. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक जबाबदारीची जाणीव विकसित होते.

शिक्षणामुळे आधीपासून चाललेले करिअर अधिक उंचीवर नेण्यात मदत होते: उच्चशिक्षण हे नव्यानेच पदवी शिक्षण पूर्ण केलेल्यांसाठीच असते असे नाही. ज्या लोकांनी आधीपासून व्यावसायिक करिअर सुरू केले आहे, तेही आपला अनुभव वाढवण्यासाठी तसेच करिअरमध्ये अधिक संधी प्राप्त करण्यासाठी एक्झिक्युटिव एमबीएसारख्या अभ्यासक्रमांचा पर्याय निवडतात.

शिक्षण तुम्हाला अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी आव्हान देते: आव्हानाला तोंड देणे कठीण वाटते पण जेव्हा तुम्ही यशस्वीरित्या आव्हानावर मात करता, तेव्हाची भावना अद्वितीय असते. ज्या संस्थेमध्ये प्रत्येकजण प्रेरित व निश्चयी असतो आणि संधी मुबलक असतात, तेथे तुम्हीही अधिक आव्हाने स्वीकारण्यासाठी प्रेरित  होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Most Popular

- Advertisements :-

- Advertisment -spot_img

Recent Comments

You cannot copy content of this page

[lead_popup_form_builder]