समर्पित भावनेेने काम केल्यामुळेच गावचा व देशाचा चौफेर विकास होईल
– माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.12/प्रत्येक गाव ते देशाचा विकास त्या नेत्याच्या कर्तबगारीवर विचारावर अवलंबून असतो. आणि ही शक्ती विचार हे महात्म्याच्या विचारातून, संस्कारातून येतात. हे संस्कार आत्मविश्वास वाढवून समर्पित भावनेने काम करण्याची शक्ती देतात. संकटाला तोंड देण्याची शक्ती देतात, ही शक्ती आपणांस छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, डॉ.आंबेडकर यांच्या प्रेरक विचारातून मिळाली. त्यामुळेच आपणांस गावचे सरपंच ते विधानसभा व इतर संस्थेमध्ये समाजकारण व राजकारणात स्वाभिमानाने संस्था वाढविण्यासाठी समाजाच्या विकासासाठी काम करता आले. देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी, स्वामी विवेकानंद व भारतीय संस्कृतीच्या विचाराने राष्ट्रउभारणीचे कार्य निष्स्प्रहपणे करीत आहेत. त्यामुळेच भारताचा गौरव जगामध्ये होत आहे, अशा पध्दतीने समर्पित भावनेेने काम केल्यामुळेच गावचा व देशाचा चौफेर विकास होईल असे प्रतिपादन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते स्वामी दयानंद विद्यालय व महाराष्ट्र विद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाढदिवसानिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला जेएसपीएम संस्थेच्या सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, शै.समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक बापूसाहेब गोरे, समन्वयक विनोद जाधव, एम.एन.एस.बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, प्राचार्य सच्चिदानंद जोशी, राजकुमार साखरे, गोविंद शिंदे, मारूती सुर्यवंशी, शैलेश कचरे,मोहन खुरदळे, सुुनिता मुचाटे, चेवले सर, अनिल सोमवंशी, आशा जोशी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष भागवतराव घार, उपसरपंच किशोर घार, ग्रामसेवक अनंत सुर्यवंशी, जाफरभाई पटेल, मुख्याध्यापिका अरूणा कांदे, कुसूमताई मोरे, विद्याताई देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले जेएसपीएम संस्थेने सी.बी.सी.एस.शिक्षण पध्दतीवर भर दिलेला आहे. ही शिक्षणपध्दती देशाला निश्चितच एका प्रगतीच्या शिखरावर घेवून जाणार आहे. टॅलेंट व गुणवत्ता हीच जात व मानवता हाच धर्म समजून संस्थेची व जीवनाची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे. अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारीत शिक्षणाद्वारे तेजस्वी विद्यार्थी आपणाला तयार करावयाचे आहेत. यासाठी भारत हा भाग्यवान देश आहे. या देशात छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ए.पी.जे.अब्दुल कलाम, महात्मा फुले यांच्यासारखे महान नेते होऊन गेलेले आहेत. त्यांचे विचार आत्मसात करून त्या-त्या क्षेत्राचे पावित्र राखुन आपली वाटचाल यशस्वीपणे चालु आहे. त्यामुळे प्रत्येकांनी राष्ट्र व समाज उभारणीसाठी सक्रियपणे योगदान द्यावे, असे आवाहनही भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना केले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वामी दयांनद विद्यालाय व महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा वाढदिवसानिमित्त सामुहिक सत्कार केला. तसेच वाढदिवसानिमित्त लायनेस क्लबच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुध्याध्यापिका अरूणा कांदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दुल गालीब शेख यांनी मानले.
कुटुंबाला आधार देण्याचे
काम साहेबांनीच केले
– सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर
समाजकारणाला राजकारणाची जोड देत भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर साहेबांनी कुटुंबाला आधार देण्याचे काम केले. आमच्यासाठी ते खरेखुरे महात्मा फुलेच आहेत. राजकारणात नेता कसा असावा? कव्हेकर साहेबांसारखा असावा… कव्हेकर साहेबांनी राजकारणाबरोबर समाजातील परिस्थितीचा चौफेर अभ्यास करून कव्हा गावाला राज्यस्थरावर वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. तसेच मलाही राजकीय, सामाजिक कार्यात काम करण्यासाठी कव्हेकर साहेबांनीच वेळोवेळी आधार देण्याचे काम केलेले आहे. आज मी जे काही आहे. ते कव्हेकर साहेबांमुळेच.. पुर्वीच्या पुण्याईमुळेच आमच्या कुटुंबाला अन् मलाही कव्हेकर साहेबांसारख्या व्यक्तीमत्त्वाची साथ मिळालेली आहे. त्यामुळे खर्या अर्थाने आमच्या कुटुंबाला सक्षमपणे आधार देण्याचे काम कव्हेकर साहेबांनीच केलेले आहे. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केलेले आहे.
————————————————–











