परिसंवाद :- शेतकऱ्यांची दुःस्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयीपणा ,लेखक ,कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका…
नाशिक दि.०५
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये शेतकऱ्यांची दुःस्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयीपणा ,लेखक ,कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका या परिसंवादाचा कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. अध्यक्षस्थानी लेखक शेषराव मोहिते हे होते. याप्रसंगी प्राध्यापक हरी नरके ,विलास शिंदे, रमेश जाधव, शैलेंद्र तनपुरे ,संजय आवटे उपस्थित होते .”लष्करी तोयबा पेक्षा लष्करी होयबा” हा जास्त घातक असल्याचे विधान मांडण्यात आले. शेतकरी कायदे हे कोणतीही चर्चा, विचारविनिमय न करता देशावर लादले गेले आणि कोणतीही चर्चा न करता मागे घेण्यात आले. साहित्यिकांनी व कलाकारांनी सरकारला प्रश्न विचारणे हे त्यांचे कर्तव्य असल्याचे विधान सर्वांना उद्देशून व्यक्त करण्यात आले. निशिकांत भालेराव यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये १८ टक्के योगदान आहे असे मत व्यक्त केले. “स्केल ऑफ फायनान्स”, “स्केल ग्राफ” हा शेती व्यवस्थेमधील महत्त्वाचा विषय असल्याचे मत मांडण्यात आले. याप्रसंगी सह्याद्री फार्म चे संचालक विलास शिंदे उपस्थित होते. हे शेती व्यवस्थेमध्ये २३ हजार हेक्टरवर सध्या काम करत आहे.याप्रसंगी “शेतकरी खामोश आहे पण तू गप्प बसणार नाही “हे वक्तव्य करण्यात आले .प्रेक्षक वर्ग आणि रसिकप्रेमिकांप्रेमी कडून या विधानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


