शेतकऱ्यांची मुले उद्योग आणि व्यवसायात
पुढाकार घेत आहेत ही समाधानाची बाब
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख
लातूर शहरातील विश्व मेडिकल अँड डिस्ट्रीब्युटर्सचे उद्घाटन
लातूर शहरातील अंबाजोगाई रोड येथील सौरभ सूर्यवंशी यांनी सुरू केलेल्या विश्व मेडिकल अँड डिस्ट्रीब्युटर्स या फर्मचा शुभारंभ पालकमंत्री ना. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते मंगळवार दि. ३ मे रोजी सायंकाळी लातूर शहरातील अंबाजोगाई रोड येथील विश्व मेडिकल अँड डिस्ट्रीब्युटर्स चे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार वैजनाथ दादा शिंदे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा चेअरमन अनंतराव देशमुख, रेणाचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, लातूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य समद पटेल, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, लातूर युवक काँग्रेस अध्यक्ष इमरान सय्यद, चंद्रकांत पाटील, लातूर सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश सूर्यवंशी,ज्ञानोबा सूर्यवंशी, विठ्ठल सूर्यवंशी, पंडित ढमाले, बालासाहेब सूर्यवंशी, सूर्यवंशी कुटुंबीय मित्रपरिवार आधीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री ना. अमित देशमुख म्हणाले की, सौरभ सूर्यवंशी हा तरुण प्रगतशील शेतकरी कुटुंबातील आहे. रेणा सहकारी साखर कारखान्याला सर्वाधिक ऊस पुरवठा हे कुटुंबीय करतात स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा त्यांनी विचार केला, लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी साखर उद्योग उभा केला तो जनसामान्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी केला तोच विश्वास शेतकऱ्यांनी सार्थ केला आहे. त्यामुळे नोकरी करण्याचा विचार त्यांच्यात येत नाही असे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, शेतकरी कुटुंबात व्यवसाय करण्याचा विचार रुजतो आहे त्याला गती देण्याचे काम चालू आहे. या मेडिकलने व्हाट्सअप वरून होम डिलिव्हरी सेवा द्यावी, परिसरातील रुग्णालयाला या मेडिकल मधून औषधे पुरवठा होईल, लातूरमध्ये एक नवीन दुकान सुरू होत आहे, याचा मला आनंद आहे. आजारी न पडण्यासाठी ही काही औषधे आहेत त्याला वेलनेस असे म्हणतात ते ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा असे सांगून त्यांनी सूर्यवंशी परिवाराच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थितांना अक्षय तृतीया, भगवान परशुराम जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती आणि रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
————